Headlines

घाटी रुग्णालयात OPD साठी चार नवीन औषध वितरण केंद्रे सुरू:रुग्णांना उपचाराच्या ठिकाणीच औषधे मिळतील, गर्दी कमी होऊन वेळेची बचत होईल




छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे रुग्णांची वाढती संख्या आणि औषध वितरणातील गर्दी कमी करण्यासाठी नवीन ‘औषधालय बाह्यरुग्ण विभाग औषध वितरण केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. या चार नवीन औषध वितरण केंद्रांमुळे बाह्यरुग्ण विभागात (OPD) तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना उपचाराच्या ठिकाणीच आवश्यक औषधे तात्काळ मिळतील. यामुळे मुख्य औषध केंद्रावरील गर्दी कमी होईल आणि रुग्णांचा वेळ वाचेल. अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्या नेतृत्वाखाली २०२३ पासून औषध साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यावेळी ५६ औषधे उपलब्ध होती, ती संख्या आता थेट ४४० पर्यंत पोहोचली आहे. या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे. वैद्यकीय निरीक्षक डॉ. हरबडे यांनी रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. औषधशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एम. एस. बेग यांनी केंद्राच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले, तर प्रभारी औषध निर्माता बालाजी मुंडे यांनी औषध भांडार व्यवस्थापनाची माहिती दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी औषधशास्त्र विभाग, फार्मसी विभाग, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *