![]()
भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या रॅलीत वाजवलेल्या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते. हे विधान सोशल मीडियावर पसरल्यानंतर एका 42 वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचवल्याच्या आरोपावरून बुलडाणा शहर पोलिसांनी मध्यरात्री आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजय गायकवाड म्हणाले होते की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाने रॅली काढून वाढदिवस साजरा केला, याचे वाईट वाटते. फाईट करायची असेल तर विकासाच्या मुद्द्यांवर करा. बाप तो बाप रहेगा, हे एखाद्या पुरुषाने बोलले तर शोभून दिसते. पण एखाद्या बाईने जर म्हटले की मी बाप आहे, तर बापासारखे शरीर कुठून आणणार? यासोबतच राजकारणातला बाप कोण आहे, हे योग्य वेळी दाखवून देऊ. नेमके प्रकरण काय? काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आणि आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा शहरात मित्रपरिवाराच्या वतीने एक भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान ‘बाप तो बाप रहेगा… हे गाणे वाजवण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महाले यांनी आमदार गायकवाड यांना नाव न घेता टोला लगावला होता. या गाण्यावर आणि महाले यांच्या टीकेवर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, आमदार संजय गायकवाड यांची जिभ घसरली. रोहित पवारांची पोस्ट काय? आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, आमदार श्वेताताई महाले यांच्यावर अश्लील भाषेत टिप्पणी करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंद करून घेतल्याबद्दल पोलिसांचे आभार. दोन दिवसांपूर्वी कोथरूड पोलिस स्टेशनला आरती रेडेकर-आंबी, सोनाली कांबळे यांनी देखील विनयभंगाचा दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली, आम्ही चार तास ठिय्या मांडून बसलो, परंतु पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला नाही. संतोष पंडित प्रकरणात रात्री 1 वाजता गुन्हा नोंद करून तासाभरात अटक सुद्धा केली होती परंतु सोनाली कांबळे यांनी दखलपात्र गुन्ह्याची तक्रार देऊन 5 दिवस होऊन गेले तरी दखल घेतली नाही.
पोलिस मुख्यमंत्र्यांच्या राजकीय आदेशाने काम करतात का? रोहित पवार म्हणाले की, संविधानानुसार कायद्यासामोर प्रत्येक नागरिक समान असताना श्वेताताईंशी संबधित तक्रारीवर क्षणाचाही विलंब न लावता गुन्हा दाखल होतो, संतोष पंडितवर गुन्हा दाखल होतो तर मग सोनाली कांबळे, आरती रेडेकर-आंबी यांच्या दखलपात्र गुन्ह्याच्या तक्रारीवर गुन्हा का दाखल होत नाही? पोलिस संविधानाच्या विरोधात का वागत आहेत? पोलिस मुख्यमंत्र्यांच्या राजकीय आदेशाने काम करतात का? पोलिसांकडून संविधानविरोधी कामे करून घेतली जात आहेत रोहित पवार म्हणाले की, पोलिस अधिकारी चांगले आहेत परंतु राजकीय दबावाने त्यांच्याकडून संविधानविरोधी कामे करून घेतली जात आहेत. सोनाली कांबळे, आरती रेडेकर-आंबी, संतोष पंडित, बुलडाणा केस या तिन्ही प्रकरणात पोलिस विभागाचा राजकीय सावळागोंधळ आणि संविधान विरोधी कारभार पुढं आला असून त्यामुळं पोलिस प्रशासन ‘मुख्यमंत्र्यांच्या ताटाखालचे मांजर’ झाले आहेत अशी सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे, हे दुर्दैव आहे.
राजकीय आदेशकर्तेही यातून सुटणार नाहीत रोहित पवार म्हणाले की,सिलेक्टिव्ह प्रकरणात राजकीय दबावाखाली खोटा गुन्हा दाखल करायचा आणि विरोधकांचा विषय असेल तर खऱ्या प्रकरणाताही गुन्हा दाखल करायचा नाही, हे बेकायदा आहे. हे प्रकरण आता हायकोर्टापर्यंत पोचलं असून ज्यावेळी पोलिस विभागाच्या या संविधानविरोधी कामाची चौकशी होईल तेंव्हा संबंधित अधिकारी मात्र गोत्यात येतीलच पण त्यांचे राजकीय आदेशकर्तेही यातून सुटणार नाहीत, यात शंका नाही!
Source link