Headlines

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात:8 ते 10 जण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही, रत्नागिरीच्या राजापूरजवळील घटना




गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणातील आपल्या गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या वाहनाला रविवारी सकाळी राजापूर तालुक्यात भीषण अपघात झाला. हातिवले येथील अंकिता पॅलेससमोर चारचाकी गाडीचा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनातील 15 प्रवाशांपैकी 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. गाडीतील सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तत्काळ धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.राजापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातानंतर भीषण वाहतूक कोंडी उद्या, 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबई, पुणे येथून लाखो चाकरमनी कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. या गर्दीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. इंदापूर आणि माणगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अवघे 10 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी 2 ते 3 तासांचा कालावधी लागत आहे. ‘समृद्धी’वर भरधाव ट्रकचे ‎टायर फुटून अपघात; 1 ठार‎ दुसरीकडे समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकचे‎ समोरील टायर अचानक फुटल्याने‎ भरधाव ट्रक दुभाजकात जाऊन उलटली. सावंगी परिसरातील ‎मुंबई कॉरिडॉरवर (चॅनेल क्र.426) झालेल्या या अपघातात‎ ट्रकमधून प्रवास करणाऱ्या एका‎ तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनंत ‎ताराचंद डुलत (30) असे मृताचे ‎नाव आहे.‎ शेंद्रा येथून वैजापूरच्या दिशेने‎ टोमॅटो व पालेभाज्या घेऊन जाणारा‎ ट्रक (एमएच 20 जीसी 9231)‎सावंगी परिसरातून जात असताना‎त्याचे समोरील टायर अचानक ‎फुटले. यामुळे चालक सुदर्शन मिटू‎ माहेर (24, रा. कच्ची घाटी) याचे‎ वाहनावरील नियंत्रण सुटले आणि‎ ट्रक थेट मिडल स्पेसमध्ये जाऊन‎ उलटला. या दुर्घटनेत अनंत डुलत ‎यांचा मृत्यू झाला. अपघाताची ‎माहिती समृद्धी महामार्ग नियंत्रण‎ कक्षाला रात्री 7.33 वाजता‎ मिळताच आरपीव्ही, रुग्णवाहिका‎ आणि एचएसपी पथक रात्री 8‎ वाजता घटनास्थळी दाखल ‎झाले.फुलंब्री पोलिसांसह महामार्ग‎ बचाव पथकाने तातडीने मदतकार्य‎ राबवून पुढील कार्यवाही केली.‎ हे ही वृत्त वाचा नागपुरात सुनेची कुऱ्हाडीने हत्या करत सासऱ्याची विहिरीत उडी:मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशयातून पिवळी नदी परिसरातील धक्कादायक घटना
जादूटोणा करून मुलाचा जीव घेतल्याच्या संशयातून एका 70 वर्षीय वृद्ध सासऱ्याने स्वतःच्या सुनेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी, पाहुणे ले-आउट परिसरात घडली. लक्ष्मी रविशंकर पाली असे मृत महिलेचे नाव असून, नत्थूलाल पाली असे आरोपीचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी सासऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *