Headlines

समोरचा हिंदू नसेल तर सामान घेऊ नका:आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित, मगच इतर, हिंदूंना त्रास दिल्यास तांडव करू- नीतेश राणे




समोरचा व्यक्ती जर हिंदू असतील तरच त्यांच्याकडून सामान घेतले पाहिजे. समोरचा व्यक्ती जर हिंदू नसेल टीका लावत नसेल, त्याला हनुमान चालीसा किंवा गणपती बाप्पांची आरती आली पाहिजे तरच मी त्यांच्याकडून वस्तू विकत घेईल ही भूमिका प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे, असे भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. आमच्या सरकारमध्ये पहिले हिंदूंचे हित पाहिले जाणार मग सर्वांना मोजणार हे आमच्या डोक्यात स्पष्ट आहे. कोणीही वळवळ करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. नीतेश राणे म्हणाले की, जेव्हा जेव्हा हिरव्या रंगाचा राक्षस आपल्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघेल त्यावेळी प्रत्येक हिंदूंने समोर यावे असे वराह जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबईतील तुर्भे नाका, हनुमान नगर येथे आयोजित कार्यक्रमावेळी त्यांनी म्हटले आहे. ..इथे शरिया नाही संविधान चालते नीतेश राणे म्हणाले की, काही लोकं विसरले आहेत की ते हिंदुराष्ट्रामध्ये राहतात. इथे शरिया नाही तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान चालते. त्यांनी लक्षात ठेवावे की देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. कोणीही आमच्या हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेने बघितले तर सरकार म्हणून आम्ही कोणालाही सोडणार नाही. या सरकारला हिंदू समाजाने निवडून दिले आहे. मी आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्या समोर आलो कारण तुमच्या सारख्या हिंदू समाजाने या मंत्रालयावर भगवा झेंडा फडकवला म्हणून इथे उभा आहे. ..तर मी पाहिजे तसा तांडव करेल नीतेश राणे म्हणाले की, कोणत्याही हिंदू बांधवांना त्रास दिला तर हनुमाननगरमध्ये न सांगता येईल आणि तिथे पाहिजे तसा तांडव करील. कोणीही घाबरू नका, कोणताही जिहाद आम्ही करू देणार नाही. तुम्ही मला ऐकत आहात हे मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. मुख्यमंत्री आणि सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे, हे लक्षात ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आमचा देश हा एक हिंदूराष्ट्र आहे. सर्व धर्म समभावची टेप आमच्यासमोर लावायची नाही, इथे हिंदूंना पहिले मोजले जाणार आणि मग इतरांना ही आमची स्पष्ट भूमिका आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *