![]()
बार्शी तालुक्यातील वैराग परिसरातील हिंगणी तलावातील पाणीसाठा मृतसाठ्याच्या खाली गेल्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाही काही शेतकऱ्यांकडून विद्युत मोटारीच्या सहाय्याने तब्बल पाच तास बेसुमार पाणीउपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
.
सध्या तलावात केवळ डिसेंबर पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून, शेतकऱ्यांनी उपसा करताना काळजीपूर्वक पाणी वापरण्याचा सल्ला देखील दिला आहे कारण याच प्रकल्पावरती वैराग ,गौडगाव, उपळे दुमाला हे मोठे शहरे पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो त्यामुळे येणाऱ्या काळात उपसा सुरू राहिला तर पाणी पुरवठा करताना देखील अडचण निर्माण होणार आहे.
बार्शी तालुक्यात यंदा पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटत आले तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे नदी, नाले, तलाव व बंधाऱ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यातच पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके देखील करपू लागली आहेत. अनेक भागांत शेतकरी पिके वाचविण्यासाठी पाण्यासाठी धडपडत असताना हिंगणी तलावातील उपलब्ध पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने आगामी काळातील पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
भविष्य अडचणीचे दिसते: पाऊस आणखी लांबला अणि समाधाननकारक पडला नाही तर उपलब्ध पाणीसाठा वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गावातील नागरिकांसह पशुधनासाठी चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
हिंगणी तलावातील पाणीपातळी खालावली असून, मृतसाठ्यातूनही विद्युत मोटारी लावून पाणी उपसले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. विशेष म्हणजे हिंगणी व जवळगाव प्रकल्पातून पाच तास पाणीउपसा करण्यास परवानगी असल्याचे सांगितले जात असले तरी, उपलब्ध पाणीसाठ्याची सद्यस्थिती लक्षात घेता हा उपसा थांबविण्याची गरज आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हिंगणी – जवळगाव प्रकल्पातील पाणीसाठा कमी आहे. पाण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. या दोन्ही प्रकल्पांतून उपशासाठी ५तासांची देण्यात आली आहे. इतर तलावांसाठी दोन तासांची आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रकल्पामध्ये डिसेंबर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे . शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.” -व्ही जे परदेशी, अभियंता, पाटबंधारे विभाग बार्शी