Headlines

वसमत येथून बेपत्ता झालेल्या 3 मुलींपैकी 1 मुलगी सापडली:दोघींच्या शोधासाठी तेलंगणात पथके रवाना, मोबाईलवरून रागावल्याने सोडले घर




वसमत येथून बेपत्ता झालेल्या तीन पैकी एका मुलीचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले असून त्या मुलीला रविवारी ता.13 रात्री तिच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले आहे. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून नातेवाईक रागावल्यामुळे निघून जाण्याच्या निर्णय घेतल्याचे तिने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सांगितले. आता उर्वरीत दोघींचा शोध सुुरून त्यासाठी वसमतचे पथक मराठवाड्यासह तेलंगणा राज्यात गेले आहेत. वसमत येथील एका भागातील दोन सख्या बहिणी व त्यांची एक मावस बहिण लगतच्या जिल्हयात शिक्षणासाठी राहतात. या अल्पवयीन मुली शनिवारी ता. 12 सुट्टी असल्यामुळे त्या तीनही मुली वसमत येथे घरी आल्या होत्या. मात्र घरी कोणी नसल्याने त्या काही वेळ थांबल्या त्यानंतर त्या नेमक्या कुठे गेल्या याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नसल्याने त्यांनी थेट वसमत शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक सुधीर बोंडले, जमादार गजानन भोपे यांच्या पथकाने तातडीने एक पथक स्थापन करून मुलींचा शोध सुरु केला. दरम्यान, त्यापैकी एक मुलगी त्या शिक्षण घेत असलेल्या आश्रमशाळेजवळच सापडली. त्यानंतर पोलिसांनी तिला घेऊन वसमत गाठले. त्या मुलीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून रागावल्यामुळे आम्ही परत आश्रमशाळेकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आश्रमशाळेजवळ आल्यानंतर दोघी कुठे गेल्या याची माहिती नसल्याचे त्या मुलीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या मुलीला तिच्या कुटुंबाच्या हवाली केले आहे. उर्वरत दोघींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक मराठवाड्यासह तेलंगणात रवाना झाले असून त्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *