![]()
मेळघाटातील कारंजखेड येथील १७ वर्षीय राजेश बाबु बेठेकर या विद्यार्थ्याचा पुरलेला मृतदेह तब्बल २६ दिवसानंतर बाहेर काढण्यात आला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर चिखलदरा पोलिसांनी तपास सुरू केला असून, शनिवारी (दि. १२) मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. शाळेत अन्य विद्यार्थ्यांना झालेल्या अन्नविषबाधेच्या पार्श्वभूमीवर राजेशच्या मृत्यूच्या कारणाबाबतही कुटूबियांकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे. मेळघाटातील कारंजखेड येथील १७ वर्षीय राजेश बाबुलाल बेठेकर या विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी चिखलदरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चिखलदऱ्याचे ठाणेदार प्रविणकुमार पाटील यांनी महसूल प्रशासन तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. राजेश हा आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळा योजनेअंतर्गत अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होता. १५ ऑगस्ट रोजी त्याला अचानक मळमळ, उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. घरी पोहोचल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण ^राजेश बेठेकरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. तपासासाठी शवविच्छेदन अहवाल आवश्यक असल्याने तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार १२ सप्टेंबरला मृतदेह बाहेर काढून वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. – ठाणेदार प्रविणकुमार पाटील, चिखलदरा.
Source link
पुरलेला मृतदेह कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर काढला बाहेर:राजेशचा शाळेतील अन्नातून विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय