![]()
गेल्या महिनाभरापासून राज्यात गाजत असलेल्या MH-CET परीक्षेतील घोळाबाबत अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी CET निकालाचे आणि संबंधित कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट (Forensic Audit) करण्याचा, तसेच डेटा लीक प्रकरणी FIR दाखल करण्याचा शब्द दिला असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. फॉरेन्सिक ऑडिट आणि FIR चे आश्वासन या बैठकीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना रोहित पवार म्हणाले की, “गेल्या महिनाभरापासून आम्ही CET मधील घोळाचा विषय लावून धरला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी निकालाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा शब्द शिष्टमंडळाला दिला आहे.” डेटा लीक प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या गोपनीय डेटा लीक प्रकरणी आम्ही चार-पाच तास पोलीस स्टेशनला बसून राहिलो होतो, पण तेव्हा पोलिसांनी FIR दाखल करून घेतला नव्हता. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी FIR दाखल करण्याचाही शब्द दिला आहे.” ‘एज्युस्पार्क’वरील कारवाई आणि ऑफलाईन परीक्षेवर नाराजी मुख्यमंत्र्यांनी दोन मागण्या मान्य केल्या असल्या, तरी रोहित पवार यांनी काही मुद्द्यांवरून नाराजी व्यक्त केली आहे. CET निकालाचे ऑडिट करताना ‘एज्युस्पार्क’ (EduSpark) कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यास मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. मात्र, या कंपनीने टेंडरमध्ये केलेल्या कार्टेलसंदर्भात (Cartel) कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. यासोबतच, विद्यार्थ्यांच्या हितासाठी येणारी CET परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबतही सरकारने अद्याप कुठलीही ठोस भूमिका मांडलेली नाही, यावर पवारांनी खंत व्यक्त केली. २ ते ३ दिवसांचा अल्टिमेटम “एज्युस्पार्कवर कारवाई करायला आणि CET परीक्षा ऑफलाईन घ्यायला आम्ही येत्या काळात सरकारला भाग पाडूच,” असा ठाम विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पुढील दोन-तीन दिवसांत निकालाचे फॉरेन्सिक ऑडिट आणि डेटा लीक प्रकरणात FIR या दोन प्रमुख मागण्यांवर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
————– हेही वाचा.. गणरायाचं आगमन, महाराष्ट्रात जल्लोष: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी देशभरासह राज्यभरात आजपासून लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असून, मुंबईत गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजापासून ते गणेश गल्लीपर्यंत बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविक आणि राजकीय दिग्गजांची गर्दी उसळली आहे. यंदा लालबागच्या राजाचा मंडप आणि बाप्पाचे स्वरूप ‘महादेव (शिव)’ थीमवर आधारित आहे. या देखाव्याच्या केंद्रस्थानी एक विशाल त्रिशूळ उभारण्यात आला असून बाप्पाचे रूप अत्यंत मनमोहक दिसत आहे. सविस्तर वाचा
Source link
MH-CET घोटाळा:मुख्यमंत्र्यांकडून ऑडिट-FIR चे आश्वासन, पण रोहित पवारांचा इशारा कायम; म्हणाले- परीक्षा ऑफलाईन घ्यायला भाग पाडूच