Headlines

कुठे रिमझिम; काही ठिकाणी जोरदार पावसाचे पुनरागमन:पिकांना नवसंजीवनी; दुष्काळाचे सावट कायम‎




शहरात रविवारी कुठे रिमझिम तर कुठे काही वेळ जोरदार पाऊस झाला. दिवसभरात ५.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यंदा उन्हामुळे प्रचंड त्रस्त झालेल्या अकोलेकरांना धो-धो पाऊस बरसेल, अशी अपेक्षा होती. मात्र जून महिन्याच्या प्रारंभी फारसा पाऊस झाला नाही. २३ जून रोजी रात्री शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला होता.त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. जुलै महिन्यात तर उकाडा प्रचंड वाढला. मात्र महिन्याच्या अखेरीस सकाळी पाऊस बरसला. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा दीर्घ खंड पडला. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या १० दिवसातही पावसाने पाठ फिरवली. मात्र दोन दिवसांपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे नागरिकांचे जुने शहरात पुन्हा हाल झाले. गत काही महिन्यांपासून रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून, खोदलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले. त्यामुळे चालकांचे हाल झाले. गांधी रोडवर दुकानांवर पाण्याचे लोट वाहले. तसेच त्या ठिकाणी चिखलही निर्माण झाला. पाऊस, चिखल अन् रस्त्यावरच हातगाड्यांवर दुकाने थाटण्यात आल्याने वाहन चालक व नागरिकांचे वाट काढताना हाल झाले. अशोक वाटिका चौकातील उड्डाण पुलाजवळ मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या मार्गावर पावसाचे प्रचंड पाणी साचले होते. त्यामुळे चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. तालुका पडलेला पाऊस अकोट १२.८(मि.मी.) तेल्हारा १४.३ बाळापूर ३.५ पातूर ४.९ अकोला १.६ बार्शीटाकळी २.२ मूर्तिजापूर २.५ जिल्हा सरासरी ५.५(मि.मी.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *