Headlines

पापरीतील शाळेत साकारल्या मातीच्या गणेशमूर्ती‎:पीएमश्री जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्यासाठी राबवला उपक्रम‎




पीएमश्री आदर्श प्राथमिक शाळा पापरी ता.मोहोळ येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी,तसेच सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचा संदेश मिळावा,या उद्देशाने दैनिक दिव्य मराठीच्या घरोघरी मातीचे गणेश या उपक्रमाच्या प्रेरणेने मातीपासून गणपती तयार करणे हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नैसर्गिक मातीपासून आकर्षक ५० हून अधिक गणेशमूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेचा आणि कलागुणांचा वापर करून विविध गणेशमूर्ती साकारल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्याला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरणाविषयी प्रेम आणि जबाबदारीची भावना विकसित झाली. या उपक्रमासाठी शिक्षिका आशा चौधरी,उषा भोसले यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले.मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे, केंद्रप्रमुख ऋषिकेश जगताप यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर गणेशमूर्तींचे कौतुक करून भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शाडूची माती किंवा नैसर्गिक मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर सहजपणे पाण्यात विरघळतात. त्यामुळे जलप्रदूषण होत नाही. त्यामुळे मातीची गणेशमूर्ती, पर्यावरणाची समृद्धी हा संदेश विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत पोहोचवला. अनेक विद्यार्थ्यांनी आपण स्वतः बनवलेले मातीचे श्रीगणेश आपल्या घरी विराजमान करणार असल्याचे यावेळी सांगितले. विद्यार्थी स्वत: बनवलेल्या गणेश मूर्तींची आपल्या घरी प्रतिष्ठापना करणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *