![]()
यश मिळवण्यासाठी नशीबाची साथ लागते, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, परिस्थिती प्रतिकूल असतानाही योग्य निर्णय, बुद्धी, जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःचं आयुष्य बदलणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत. अशाच व्यक्तींच्या संघर्षापासून यशापर्यंतच्या प्रवासाला व्यासपीठ देणारी नवी मालिका ‘यशाधिपती’ दिव्य मराठी घेऊन येत आहे. या मालिकेत केवळ यशाची गोष्ट नाही, तर त्या यशामागचा संघर्ष, घेतलेले निर्णय, आलेली अपयशं आणि त्यातून शोधलेला मार्ग उलगडला जाणार आहे. परिस्थितीशी दोन हात करत, अपयशाला संधीमध्ये बदलत आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर अशक्य वाटणारी स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणाऱ्या असामान्य व्यक्तींच्या कथा ‘यशाधिपती’मधून समोर येणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या या व्यक्तींनी यशाचा मार्ग कसा शोधला, त्यांच्या प्रवासात कोणती आव्हानं आली आणि निर्णायक क्षणी घेतलेल्या कोणत्या निर्णयांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली, हे या मालिकेतून जाणून घेता येणार आहे. यश म्हणजे केवळ नशिबाने मिळालेली संधी नसून, बुद्धी, जिद्द आणि कर्तृत्वातून घडवलेली गोष्ट आहे’, हा विचार केंद्रस्थानी ठेवणारी ‘यशाधिपती’ ही मालिका उद्यापासून फक्त आपल्या दिव्य मराठी ॲपवर पाहता येणार आहे.
Source link
गणेशोत्सव विशेष:प्रतिकूल परिस्थितीत योग्य निर्णय, बुद्धी, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर आयुष्य बदलणाऱ्या अफलातून कहाण्यांची मालिका 'यशाधिपती' उद्यापासून दिव्य मराठी डिजिटलवर!