Headlines

दगडूशेठ गणपती बाप्पा मयूर रथातून प्रेम मंदिरात विराजमान:श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणेशोत्सवाचा प्रारंभ, हजारो भाविकांची गर्दी




गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून फुलांनी सजवलेल्या मयूर रथातून दिमाखदार आगमन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीने वाजत गाजत वृंदावनमधील प्रेम मंदिराच्या जय गणेश प्रांगण येथे साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रींचा हा आगमन सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या १३४ व्या वर्षानिमित्त हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हजारो भक्तांच्या साक्षीने उत्सवाचा प्रारंभ झाला. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. उत्तरप्रदेश वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त रोहित लोंढे, पराग वांबुरे, राजेंद्र गावडे आणि सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते. त्यांच्यासोबत सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेही हजर होते. सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजवलेल्या मयूर रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गंधाक्ष ढोल ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड सहभागी झाले होते. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे ही मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचली. मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ऋषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३५ हजार महिला सामुदायिकपणे अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले उपस्थित राहणार आहेत. तसेच रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू गणरायाला सेवा अर्पण करतील. हेही वाचा.. राज्यभरात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन:घराघरांत आणि मंडळामध्ये गणराय विराजमान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी देशभरासह महाराष्ट्रात आज लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन होत असून, मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मुंबईतील रस्ते दुमदुमले असून, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या प्रसिद्ध गणेश मंडळांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *