![]()
केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शासकीय ताफ्यात एका दुचाकीस्वाराने शिरण्याचा प्रयत्न केला. ही घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे शहरातील संचेती चौकात घडली. या प्रकरणी बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम विजय वनित (वय ३२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सहायक पोलीस फौजदार ईश्वर भिकुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे. भिकुले हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्त असून, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे अंगरक्षक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मंत्री मोहोळ यांचा ताफा संचेती चौकातून जात होता. ताफ्यातील वाहनांनी सायरन वाजवून वाहनचालकांना पुढे जाण्याची सूचना दिली होती. तरीही, दुचाकीस्वार शुभम वनित याने ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे अडथळा निर्माण झाला. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. काठे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावला पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना छत्रपती शिवाजी पुलावर घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय तरुण रांजणगाव परिसरात राहायला आहे. १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तो शनिवार वाडा परिसरातून छत्रपती शिवाजी पुलाकडे निघाला होता. पुलाजवळ त्याला एका चोरट्याने अडविले. संपर्क साधण्यासाठी मोबाइल मिळेल का? , अशी विचारणा चोरट्याने तरुणाकडे केली. तरुणाने त्याला नकार दिला. तरुणाचे लक्ष नसल्याची संधी चोरट्याने साधली. तरुणाकडील दहा हजारांचा मोबाइल हिसकावून चोरटा पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक एस पाटील तपास करत आहेत. हेही वाचा.. रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तुल, जिवंत काडतूस जप्त:सिंहगड रोड पोलिसांनी सिद्धेश पवारला केली अटक; आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांनी कारवाई केली. गस्त घालत असताना पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी सिद्धेश सुरेश पवारला (वय ३१, रा. विश्रांतिनगर, हिंगणे खुर्द, पुणे) अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सविस्तर वाचा
Source link
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात दुचाकी घुसवण्याचा प्रयत्न:संचेती चौकातील घटना, गुन्हा दाखल