Headlines

हिंगोलीत 'एक गाव एक गणपती' संकल्पनेला तडा:जिल्ह्यात 246 नवीन गणेश मंडळे वाढली, डीजे बंदीवर पोलिसांचा भर




हिंगोली जिल्ह्यात एक गाव एक गणपतीची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत 122 ने घटली आहे. मागील वर्षी 313 ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्यात आली होती तर यावर्षी केवळ 191 ठिकाणी या संकल्पनेला मुर्त स्वरुप मिळाले आहे. पोलिसांकडून करण्यात आलेली जनजागृती निष्फळ ठरल्याचे बोलले जात आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली. त्यासाठी तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बैठकांमधून ही संकल्पना राबविण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले होते. त्यानुसार दरवर्षी 710 पैकी किमान 250 पेक्षा अधिक गावांमधून ही संकल्पना राबवली जात होती. मागील वर्षी तब्बल 313 गावांमधून ही संकल्पना राबविण्यात आल्याने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही हलका झाला होता. तर मागील वर्षी 1464 ठिकाणी गणेशमुर्तीची स्थापना झाली होती. मात्र यावर्षी पोलिस विभागाने एक गाव एक गणपती या संकल्पनेकडे विशेष लक्ष दिलेच नाही. उलट डीजेवरील बंदीलाच अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे बैठकांमधून ही संकल्पना मांडल्यानंतरही अनेक गावांनी या संकल्पनेला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे यावर्षी केवळ 191 गावांमधूनच एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या शिवाय मागील वर्षी जिल्ह्यात 1463 ठिकाणी गणेशमुर्तीची स्थापना झाली होती. तर यावर्षी तब्बल 1710 ठिकाणी गणेशमुर्तीची स्थापना झाली आहे. गणेश मंडळांची संख्या वाढल्याने आता पोलिसांवर बंदोबस्ताचा अधिकचा ताण येणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. औंढा पोलिस ठाण्यांतर्गत सर्वात जास्त 215 ठिकाणी गणेश मुर्तीची स्थापना झाली आहे. हिंगोली शहर 104, कळमनुरी 129, बासंबा 105, हिंगोली ग्रामीण 110, नर्सी नामदेव 98, सेनगाव 195, गोरेगाव 119, वसमत शहर 104, वसमत ग्रामीण 115, आखाडा बाळापूर 153, कुरुंदा 91 तर हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत 171 ठिकाणी गणेशमुर्तीची स्थापना झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *