Headlines

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण:5 प्रकल्पांचा लोकार्पण समारंभ लांबणीवर, सीएम काय बोलणार याकडे लक्ष




मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात फक्त गुरुवारी, 17 सप्टेंबर रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रमच नियोजित आहे. व्यग्र वेळापत्रकामुळे शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फक्त सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभावर ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना मानवंदना देऊन तातडीने मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान, मराठवाड्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्री आपल्या भाषणातून काय जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत दौऱ्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 16 सप्टेंबरच्या रात्री छत्रपती संभाजीनगरात आगमन झाले. दुसऱ्या दिवशी, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8:45 वाजता सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण समारंभ पार पडेल आणि सकाळी 10:10 वाजता ते विमानाने पुन्हा मुंबईकडे प्रयाण करतील. दौऱ्यात इतर कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा बैठकीचा समावेश नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. आंदोलनासाठी उद्धव ठाकरे शहरात दाखल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे विभागीय आयुक्तालयावर निदर्शने केली जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. यात हजारो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्या वाहनांसाठी शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. दरम्यान, ठाकरे यांचे रात्री शहरात आगमन झाले. त्यांनी सिद्धार्थ उद्यानात हुतात्मांना आदरांजली अर्पण केली. मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्याने अत्यंत गंभीर आणि भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील बहुतांश धरणांमध्ये अवघा 20 टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने मोठे संकट ओढवले आहे. ऐन पावसाळ्यातच पिकांना पाणी मिळेनासे झाल्याने बहुतांश पिके करपून गेली आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की, पावसाळ्याच्या दिवसांतच अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागले आहेत. पावसाच्या अभावामुळे भविष्यात गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काय परिणाम होणार? मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्यामुळे आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन ऐनवेळी लांबल्याने मराठवाड्याच्या हाती काय पडले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली सर्जिकल इमारत, कॅन्सर रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेली पेट स्कॅन व रेडिएशन मशीन्स आणि प्रवाशांसाठी 61 नव्या एसी बसेस जनतेच्या सेवेत दाखल होण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. स्थानिक प्रशासनाने उद्घाटनाची संपूर्ण तयारी केली होती; मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यग्रतेमुळे या सर्व कामांचा हिरमोड झाला आहे. पुढील दौऱ्यात उद्घाटन कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत दुजोरा नव्हता. प्रत्येक विभागाने त्यांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व्हावे म्हणून मागणी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या व्यग्रतेमुळे वेळ देणे शक्य नव्हते. पुढील दौऱ्यात या प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल. – किशोर शितोळे, शहराध्यक्ष, भाजप हे होते नियोजित कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या वेळेअभावी खालील महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन लांबणीवर पडले आहे: कार्यक्रमाला एमआयएम राहणार उपस्थित एमआयएमचे नेते समीर बिल्डर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्याच्या प्रलंबित प्रश्नांवर निवेदन देण्यासाठी पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली आहे. एमआयएमच्या नगरसेवकांन कमी निधी देण्यात येतो ही आमची तक्रार आहे, असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. प्रशासनाने अद्याप भेट घडवून आणलेली नाही. वेळ न मिळाल्यास पक्षाचे वरिष्ठ नेते जी भूमिका घेतील, त्यानुसार पुढील पाऊल उचलले जाईल, असे विरोधी पक्षनेते साजेद बिल्डर यांनी सांगितले. दरम्यान, मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, असे इम्तियाज यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *