![]()
‘उकडीचे मोदक करायचे म्हणजे सकाळचे तीन तास खर्ची घालावे लागतात. ऑफिसची वेळ आणि घरची कामे सांभाळताना एवढा वेळ कुणाकडे आहे?’ चितळे रोडवरील गर्दीत मिठाईच्या दुकानाबाहेर रांगेत उभे असलेल्या गृहिणी सुनिता राऊत यांनी थेट वास्तव मांडले. शहरात यंदाच्या गणेशोत
.
माळीवाडा, चितळे रोड, दिल्ली गेट आणि सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक, गुलमोहोर रोडवरील नामांकित मिठाई दालनांमध्ये बाप्पाच्या नैवेद्यासाठी सकाळपासूनच रेडिमेड मोदक घेणाऱ्यांची गर्दी होत आहे. काजू कतलीपासून ते मलाई आणि शुगरफ्रीपर्यंतच्या व्हरायटीने बाजारपेठ सजली आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांपासून ते अलिशान अपार्टमेंट्समध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांपर्यंत साऱ्यांनाच रेडिमेडची सोय सुखावत आहे. वेळ व श्रमांची बचत उकड काढणे व कळ्या पाडण्यामध्ये वेळ लागतो. नोकरदार महिलांना वेळ व श्रमांची बचत म्हणून रेडिमेड मोदक घेण्याकडे कल आहे. टिकाऊपणामुळे बाप्पाच्या प्रदीर्घ आरती व विसर्जनापर्यंत मोदक टिकतात. तसेच आधुनिक जीवनशैलीनुसार विभक्त कुटुंबपद्धती आणि महिलांची नोकरी यामुळे तयार मोदकांना प्राधान्य दिले जात आहे. यंदा विविध व्हरायटीचे मोदक बाजारात उपलब्ध आहेत.
मोदकांचे प्रकार आणि सरासरी दर उकडीचे मोदक : ४० ते ६० रुपये प्रति नग. मावा व ड्रायफ्रूट मोदक: ६०० ते १,००० रुपये प्रति किलो. शुगरफ्री मोदक (आरोग्यदायी) : ९०० ते १,५०० रुपये प्रति किलो . शुगरफ्री मोदकांना मधुमेह असलेल्यांकडून विशेष मागणी आहे.