![]()
एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथील रहिवासी श्रीकांत आडेप यांनी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा देखावा साकारला आहे. सांस्कृतिक, धार्मिक आणि नैसर्गिक अशा तीन विषयांची सांग
.
निसर्ग वाचवा, निसर्गाशी नाते जपण्याचा संदेश दरवर्षी घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे श्रीकांत आडेप यांचा हा उपक्रम यंदाही लक्षवेधी ठरत आहे. निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्गाशी असलेले नाते जपा, असा व्यापक संदेश त्यांनी गणरायाच्या माध्यमातून दिला आहे. आधुनिक विकासाच्या वाटचालीत निसर्गाचे महत्त्व विसरता कामा नये आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, हा या संपूर्ण देखाव्याचा मुख्य उद्देश आहे.