Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:उत्सवात दररोज 75 क्विंटल फुलांची आवक; शेवंती अन् निशीगंधाला पसंती, अकोल्यासह संभाजीनगर, पुणे, जालना जिल्ह्यातून आवक



गणेशोत्सव व महालक्ष्मी (गौरी) पूजनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील मुख्य फूल बाजारात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अकोला जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांसह जालना, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथूनही शेतकरी व व्यापारी माल घेऊन येत असल्याने बाजारप

.

अकोला येथील महात्मा फुले भाजीपाला, फळे व फुलांच्या मार्केटमध्ये फुलांच्या एका आडत दुकानावर दररोज सुमारे १० क्विंटल शेवंती, तीन क्विंटल अॅस्टर, एक ते दीड क्विंटल लिली, एक ते दोन क्विंटल गुलाब, एक ते दीड क्विंटल निशीगंधाची आवक नोंदवली जात आहे. येथील मार्केटमध्ये फुलांच्या पाच ते सहा प्रमुख आडती आहेत. महालक्ष्मी उत्सवामुळे घरगुती पूजा, सजावटीसाठी शेवंती, गुलाब व निशिगंध या फुलांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे ठोक व्यापारी संदीप माणिक फुलारी यांनी सांगितले. अॅस्टर आणि शेवंती ही फुले ही पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर येथून येत आहेत, असे फुलांच्या बाजारपेठेतील प्रमुख व्यापाऱ्यांनी सांगितले. अकोला जिल्हा व परजिल्ह्यांतील शेतकरी माल घेऊन अकोला मार्केटमध्ये दुपारी तीन वाजता लिलावाला सुरुवात होते. शहरासह ग्रामीण भागातील छोटे व्यापारी फुले खरेदी करतात.

अॅस्टर व झेंडूंच्या फुलांची विक्री करताना दुकानदार. ^ यंदा गणेशोत्सव १२ दिवसांचा असल्यामुळे फुलांच्या व्यवसायासाठी चांगला काळ आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या फुलांनाही चांगला दर मिळण्यास मदत होत आहे. गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरांमध्ये तेजी आली आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांनाही १० ते २५ रुपये किलोदरम्यान भाव मिळत आहे. – सुरेश रामभाऊ फुलारी, आडते, फुल बाजार. ^मी एका एकरात शेवंतीची लागवड केली आहे. एका हंगामात पाच ते सहा तोडणी होते. प्रत्येक तोडणी सुमारे सहा क्विंटलची निघत आहे. काही माल छत्रपती संभाजीनगर ते उर्वरित ३ क्विंटल फुले अकोला बाजारपेठेत आणली आहेत. – जयलाल राजपूत, शेतकरी, छत्रपती संभाजीनगर. लिली गुलाब शेवंती निशिगंध महालक्ष्मी उत्सवामुळे घरगुती पूजा, सजावटीला फुले लागतात. लिली झेंडू

बाजारातील फुलांचे ठोक दर (प्रति किलो)

यंदा व्यवसायासाठी चांगला काळ; दरांमध्ये आली तेजी

प्रमुख एजन्सीकडून खरेदी अकोला शहरातील मुख्य (ठोक) फूल बाजार दररोज दुपारी एक वाजेपासून सुरू होतो. येथील महात्मा फुले भाजीपाला, फळे व फुले मार्केटमध्ये फुलांच्या पाच ते सहा प्रमुख ठोक एजन्सी आहेत. त्यांच्याकडून शहरातील सुमारे १०० ते १५० किरकोळ विक्रेते व हार व्यावसायिक दररोज फुले खरेदी करतात. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त फूल बाजारातील ही उलाढाल आणखी काही दिवस तेजीत राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

चांगल्या दरासाठी अकोल्यात आलो



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *