Headlines

छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात:विभागीय आयुक्त कार्यालय अन् उच्च न्यायालयात ध्वजारोहण




मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आज उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास अपर विभागीय आयुक्त प्रताप काळे, खुशालसिंह परदेशी, रिता मेत्रेवार, सहआयुक्त मंजुषा मिसकर, सर्जेराव सोनवणे, ज्ञानोबा मोकाटे, देविदास टेकाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सर्वांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मुक्तिसंग्रामात अमूल्य योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. उच्च न्यायालय खंडपीठात राष्ट्रध्वजास मानवंदना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या प्रांगणात न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजवली, त्यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. या सोहळ्याला खंडपीठातील न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे, किशोर सी. संत, आर. एम. जोशी, जितेंद्र शांतिलाल जैन, मंजुषा अ. देशपांडे, सचिन एस. देशमुख, अजित बी. कडेठाणकर, सिद्धेश्वर एस. ठोंबरे, वैशाली पाटील-जाधव, अबासाहेब धर्माजी शिंदे आणि एस. जी. चपळगावकर उपस्थित होते. तसेच सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे, प्रबंधक (प्रशासन) उमाकांत सी. देशमुख, प्रबंधक (न्यायिक) राजेश सासणे यांच्यासह न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अमर हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना भावपूर्ण अभिवादन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *