Headlines

Uddhav Thackeray Protest In Chhatrapati Sambhajinagar


मराठवाड्याचा वाढता अनुशेष, भीषण दुष्काळ, पाणीप्रश्न आणि बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत चालवलेल्या ‘तुमसे ना हो पायेगा’

.

मराठवाड्याच्या हक्क, अस्तित्व आणि स्वाभिमानासाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे. सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जातो; मात्र प्रत्यक्षात निधी दिला जात नाही. त्यामुळे वाढत्या अनुशेषावरून सरकारला ठणकावून जाब विचारण्यासाठी ठाकरे स्वतः मैदानात उतरत आहेत, असे पक्षाकडून सांगण्यात आले. तर उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठाचे आंदोलन हे नाकर्त्या लोकांचे आहे, आम्ही केवळ दावे न करता प्रत्यक्षात काम करणारे आहोत असा टोला लगावला आहे, यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पदरात काय पडले? – अंबादास दानवे

अंबादास दानवे म्हणाले की, शासनाकडून आश्वासनांची खैरात खूप झाली आणि घोषणांचे कागदी इमलेही रचून झाले; पण प्रत्यक्षात मराठवाड्याच्या पदरात काय पडले? दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे हाल आणि रोजगाराचा अनुशेष! या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना उघडे पाडण्याची वेळ आता आली आहे.

विभागीय आयुक्तालयासमोर जोरदार निदर्शने

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात हे आंदोलन होणार आहे. मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी आणि रखडलेल्या विकासाच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी शिवसैनिकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दी होऊ नये म्हणून वाहनांसाठी शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे.

हे ही वृत्त वाचा

उबाठाचे आंदोलन नाकर्त्यांचे, आम्ही काम करणारे:जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य, जरांगेंनी उपोषण सोडल्याचा आनंद- देवेंद्र फडणवीस

उबाठाचे आंदोलन हे नाकर्त्या लोकांचे आहे, आम्ही केवळ दावे न करता प्रत्यक्षात काम करणारे आहोत,” असा घणाघाती टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बोलताना, मनोज जरांगे यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचे सांगत, त्यांनी जरांगेंनी उपोषण सोडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.