![]()
अभियंत्यांच्या कामामुळेच देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. तुम्हाला जे काम येते ते प्रामाणिकपणे केल्यास तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. महाविद्यालयीन जीवनात संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे, कामाचे व वेळेचे योग्य व्यवस्थापन करता ये
.
मनपा आयुक्त डांगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या ध्येयाशी प्रामाणिक राहण्याबरोबरच खूप कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी खूप आत्मविश्वासाने करा परंतु वेळ जास्त वाया न घालवता योग्य तो निर्णय घ्या असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन मान्यवरांनी स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास कांबळे यांनी केले.
डॉ. डी. डी. पारधे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील फुलसावंगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के, इतर कर्मचारी तसेच कृषि अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत या दीक्षारंभ सोहळ्याचे औचित्य साधून कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. आपल्या उच्च शिक्षणाची सुरुवात अशा भव्य सोहळ्याने झाल्याने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवा उत्साह पाहायला मिळाला.