Headlines

सुईपासून मिसाईल निर्मितीपर्यंत दिसून येतेय अभियंत्यांची गुणवत्ता:पंढरीतील स्वेरीत अभियंता दिनी आयकर निरीक्षक लोणकर यांचे प्रतिपादन‎




‘अभियंत्यांची गुणवत्ता ही सुईच्या निर्मितीपासून ते अवकाशातील मिसाईलपर्यंतच्या प्रत्येक उपक्रमात दिसून येत असते. यामध्ये अभियंते एकाग्र होऊन आपले सर्वस्व पणाला लावतात. यासाठी अभियांत्रिकी क्षेतातील प्रत्येक विभाग महत्वाचा असतो. अभियंत्यांची गुणवत्ता ही समाजाच्या विकासाला योग्य दिशा आणि गती देत असते.’ असे प्रतिपादन आयकर विभागाचे निरीक्षक राजानंद लोणकर यांनी केले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त ‘अभियंता दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर विभागीय आयकर निरीक्षक राजानंद लोणकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रकाश वाघमारे हे होते. प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले, ‘भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची सिव्हील विभागातील अतुलनीय कामगिरी पाहता यशस्वी अभियंत्यांची व्याख्या समजते. जन्म घेणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या जन्माला सार्थक कसे बनवायचे हे आपल्या हातात असते अभियंत्यांनी प्रत्येक क्षेत्रात योगदान देण्याची तयारी ठेवावी. उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला. या वेळी तुकाराम वाघमारे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन. एस. कागदे, विश्वस्त एच. एम. बागल, विश्वस्त बी. डी. रोंगे, सचिव डॉ. सूरज रोंगे, प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, प्राचार्य डॉ. सतीश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. काळे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक’ पुरस्कार केला प्रदान अभियंता दिना’चे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात गोल्ड मेडल मिळवलेल्या डॉ. तुषार वाघमारे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच दौलतराव विद्यालय, कासेगावचे प्रा. प्रकाश ठोंबरे व न्यू इंग्लिश स्कूल वेळापूरच्या सौ.शीतल काळे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक’ पुरस्कार देण्यात आले. यावेळी डॉ.सत्यवान माळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश वाघमारे यांनीही मनोगत चालत केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *