Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मन नियंत्रणात असेल तर‎ शरीरही निरोगी राहील‎




शरीराच्या आजारांमागे मनाचाही एक अदृश्य हात असतो. हे आता‎वैद्यकीय शास्त्रसुद्धा मान्य करते. वैद्यकीय शास्त्राला मन प्रत्यक्ष‎पकडता येत नसले, तरी त्याचे परिणाम नक्कीच शोधता येतात. कारण‎मन हा शरीराचा भौतिक अवयव नसून ती एक अवस्था आहे आणि ती‎आपणच निर्माण केली आहे. या बाबतीत मन खूप चतुर आणि‎वेगवान असते. त्याच्यासमोर शरीर कमजोर पडते. मन आपल्या इच्छा‎पूर्ण करण्यासाठी शरीराचा बळी देते. कधीकधी आपल्याला वाटते‎की, आपल्या शरीराकडून असा चुकीचा प्रकार घडू नये, तरीही तो‎आपल्याकडून घडतो. आत ‘मन” नावाचा असा घटक आहे. तो‎आपली इच्छा नसतानाही चुकीची कामे करून घेतो. अध्यात्म सांगते‎कीमन शांत आणि नियंत्रणात असेल तर शरीर आपोआप निरोगी‎बनते. म्हणूनच आता ‘मानसिक स्वास्थ्या”वर जास्त काम करण्याची‎वेळ आली आहे, कारण ‘शारीरिक स्वास्थ्य” त्यावरच अवलंबून‎असते. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी २४ तासांतून काही वेळ‎योगासनांसाठी आणि ध्यानासाठी दिला पाहिजे. शरीर निरोगी ठेवायचे‎असेल तर मनावर राज्य करा, आणि मनावर राज्य करायचे असेल तर‎ध्यान करा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *