“महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कोणाचा घरगडी आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला चांगले ठाऊक आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पूर्णपणे निष्पक्षपणे काम करत आहे; मात्र उबाठा गट स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेसचा घरगडी म्हणून काम करत आहे,” असा घणाघाती पलटवार भारतीय जनत
.
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अडचणीमुळे राऊत आनंदित
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे गटावर निशाणा साधताना नवनाथ बन यांनी खळबळजनक दावा केला. “संजय राऊत जेव्हा तुरुंगात गेले होते, तेव्हा ठाकरे कुटुंबाने त्यांना कोणतीही मदत केली नव्हती. तो छुपा राग आजही राऊतांच्या मनात खदखदत आहे. त्यामुळेच आज जेव्हा दिशा सालियन प्रकरण पुन्हा समोर आले आणि आदित्य ठाकरे कायदेशीर अडचणीत सापडले, तेव्हा सर्वाधिक आनंद ‘जनाब’ संजय राऊतांना झाला आहे.”
“आदित्य ठाकरे यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त व्हावे आणि संपूर्ण पक्ष आपल्या नियंत्रणात यावा, ही राऊतांची सुरुवातीपासूनची सुप्त इच्छा आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी ते आता इतरांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत.”

‘संपतराव राऊत’ नावाने पुस्तक लिहा, बेस्ट सेलर होईल!
संजय राऊत यांच्या राजकीय भूमिकेवर प्रहार करताना ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर विचार, पक्षाची मूळ ओळख आणि हिंदुत्व संपवण्याचे काम राऊतांनी केले आहे. त्यांनी जर खरेच पुस्तक लिहायचे असेल, तर ‘संपतराव राऊत: मी शिवसेना आणि हिंदुत्व कसे संपवले’ या शीर्षकाखाली लिहावे. हे पुस्तक जगात ‘बेस्ट सेलर’ ठरेल.”
उर्दू प्रेम आणि याकूब मेमनची कबर
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातमधील भाषणात दोन शब्द गुजराती बोलले म्हणून राऊतांना पोटदुखी झाली. परंतु, महाविकास आघाडीच्या काळात मराठी भाषा भवनाऐवजी उर्दू भवनाला प्राधान्य देणारे हेच लोक होते. यांना मराठीपेक्षा उर्दू अधिक प्रिय झाली असून, अजान आणि नमाज स्पर्धांचे कौतुक करणाऱ्या उबाठा गटाने आता आपल्या पक्षाची घटनाच उर्दूमध्ये लिहावी. ज्यांनी सत्तेसाठी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केले, त्यांनी आम्हाला संस्कृती शिकवू नये.”
मोदीजींची ग्रहदशा उत्तम, राऊतांनी मातोश्रीची ग्रहदशा तपासावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या ‘आशीर्वाद का दिया’ उपक्रमावर झालेल्या टीकेला उत्तर देताना बन म्हणाले, “दिवे लावणे ही भारताची प्राचीन आणि पवित्र संस्कृती आहे. भाजप ती परंपरा पुढे नेत आहे; मात्र राऊतांची परंपरा केवळ पक्ष संपवणे आणि दिवे विझवण्याची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी देशातील 140 कोटी जनतेचा भक्कम आशीर्वाद आहे. 2029 मध्ये मोदीजी चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील.”
“राऊतांनी मोदीजींच्या भविष्याची काळजी करण्यापेक्षा ‘मातोश्री’ची ग्रहदशा कशी बिघडली आहे आणि आदित्य ठाकरेंचे ग्रह कसे फिरले आहेत, याचे आधी आत्मचिंतन करावे.”
2019चा जनादेशावर दरोडा; उबाठा विलीनीकरणाची डील?
“2019 मध्ये भाजपसोबत, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मते मागून निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. जनतेच्या मतांवर दरोडा टाकणारे तुम्ही आहात. महाराष्ट्राने 2024 मध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली असून, 2029 मध्येही जनता तुम्हाला घरीच बसवेल.”
निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या राऊतांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे, असा टोला लगावत नवनाथ बन म्हणाले, “उबाठा गट काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी आणि पक्षात विलीन करण्यासाठी तुम्ही राहुल गांधींशी किती कोटींची डील केली? गेल्या आठवड्यात राहुल गांधींना भेटून त्याचा पहिला हप्ता घेतला का, याचा खुलासा आधी राऊतांनी करावा.”
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर; 5 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर होणार
दुष्काळाच्या मुद्द्यावर शरद पवार आणि संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजप प्रवक्त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील नेते असून त्यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली आहे. स्वतः बांधावर जाऊन पोकळ घोषणा करून एक छदामही न देणाऱ्यांनी आम्हाला दुष्काळावर सल्ले देऊ नयेत.”
एनडीआरएफच्या नियमांनुसार 5 ऑक्टोबरनंतर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पिकांचे अधिकृत पंचनामे व सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. त्यानंतर बाधित भागात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना थेट शासकीय मदत दिली जाईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी केलेल्या सकारात्मक सूचनांचा सरकार निश्चितच योग्य विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
—————-
हेही वाचा
मोदी-शहा हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते : त्यांच्या पक्षाची घटना गुजराती, निवडणूक आयोग अमित शहांचा घरगडी- संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खरे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे मुख्य कार्यालय गुजरातमध्ये असून, पक्षाचे नेते गुजराती आहेत. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठीच एकनाथ शिंदे गुजराती भाषेत बोलले असावेत, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी