Headlines

Dattatray Bharne Warns Banks Over Farmer Crisis Relief In Maharashtra


राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून विशेषतः सोयाबीन आणि कापूस या पिकांचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असणे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत केल

.

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सध्या गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या बिकट प्रसंगी सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एनडीआरएफचे निकष, राज्य शासनाची थेट मदत आणि पीक विमा अशा सर्वच माध्यमांतून शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फसवणूक करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई होणार

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि कर्ज कमी असताना ते जास्त दाखवून सरकारची फसवणूक करणाऱ्या बँकांची गय केली जाणार नाही. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून अशा बँकांवर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात कोणत्याही बँकेने असा गैरप्रकार करण्याची हिंमत करू नये, अशा कडक उपाययोजना आम्ही राबवणार आहोत.

आढावा बैठकीत झोपणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी

दुष्काळ आढावा बैठकीदरम्यान काही अधिकारी निष्काळजीपणा दाखवत असल्याच्या आणि डुलक्या घेत असल्याच्या आरोपांवर बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, या बैठकीला सुमारे 300 ते 350 अधिकारी उपस्थित होते. ज्या वेळी ज्या तालुक्याची माहिती विचारली जात होती, त्या वेळचे अधिकारी आपापल्या भागाचा आढावा मांडत होते. जर एखादा अधिकारी बैठकीत झोपलेला आढळला असेल तर त्याची नक्कीच चौकशी केली जाईल. काही अधिकारी मोबाईलवर माहिती घेत असण्याचीही शक्यता असते, मात्र एवढ्या मोठ्या उपस्थितीत कोण काय करत आहे हे तात्काळ लक्षात येत नाही. तरीही निष्काळजीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

हे ही वृत्त वाचा

मुख्यमंत्री होण्यासाठी 145 चे बहुमत लागते, पहिले आमदार निवडून आणा:मंत्री भरत गोगावले यांचा अमित ठाकरेंना टोला, म्हणाले- शेतकऱ्यांना न मागताही मदत करणार

प्रत्येक मुलाला वाटणे की आपले वडील मोठ्या पदावर जावेत, यात काही चुकीचे नाही. पण त्यासाठी आधी आमदार निवडून यावे लागतात. सध्या सभागृहात त्यांचा एकही आमदार नाही. पूर्वी त्यांचे 13 आमदार होते, नंतर 1 वर आले आणि आता शून्य आमदार आहेत. अमित ठाकरे यांना जर आपले वडील मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत असेल, तर त्यासाठी 145 आमदारांचे बहुमत लागते. त्याची तयारी करून मगच त्यांनी असे बोलावे, असे मत मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.