Headlines

परतीच्या पावसावर रब्बीचे भवितव्य; 8 ऑक्टोबरपासून माघारीचे संकेत:24 तासांत 8.6 मिलीमीटर पाऊस; दक्षिण जिल्ह्यात जोरदार सरी‎




शहरासह जिल्ह्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक उन्हाचे चटके जाणवत असताना त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले. रात्री ७.१५च्या सुमारास अहिल्यानगर शहरात जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्यांसाठी आशादायक वातावरण तयार झाले असले, तरी काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या सोयाबीनला या पावसाचा फटका बसण्याची भीती आहे. दरम्यान, ८ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाची माघार सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या १ ते १९ या कालावधीत जिल्ह्यात केवळ १६ मिमी पाऊस झाला होता. मात्र, २० सप्टेंबरच्या २४ तासांत सरासरी ८.६ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजे गेल्या १९ दिवसांत झालेल्या पावसाच्या निम्म्याहून अधिक पाऊस अवघ्या २४ तासांत झाला. दक्षिण जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला. श्रीगोंदे येथे सर्वाधिक १८.६, अहिल्यानगर १८.१ आणि पारनेर येथे १६.६ मिमी पाऊस झाला. नेवासा १२.७, राहुरी १२.४, अकोले ११.५, संगमनेर ५.६, कर्जत ३.४, जामखेड २, शेवगाव १.८, पाथर्डी १.६ आणि श्रीरामपूर ०.१ मिमी पाऊस झाला. दक्षिण अहिल्यानगर रब्बी ज्वारी, हरभरा व गव्हाचे प्रमुख क्षेत्र असल्याने परतीचा पाऊस रब्बीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जमिनीत खोलवर ओलावा निर्माण झाल्यास रब्बीच्या पेरण्या वेळेत होण्यास मदत होईल. मात्र, सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू होत असल्याने शेतात पाणी साचल्यास शेंगांना मोड फुटणे, दाणे काळे पडणे आणि प्रतवारी घसरण्याचा धोका आहे. तूट कायम; परतीच्या सरींवर भरपाईची आशा सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात सरासरी १०२.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ २३.१ मिमी म्हणजे २२.४ टक्के पाऊस झाला आहे. १ जूनपासून २७७.१ मिमी पाऊस झाला असून, अपेक्षित ४०४ मिमीच्या तुलनेत हे प्रमाण ६८.६ टक्के आहे. त्यामुळे परतीचा पाऊस सक्रिय राहिल्यासच पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात परतीचा पाऊस नियोजित वेळेत ^ जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, त्याचा रब्बी पिकांना फायदा होऊ शकतो. राजस्थानातून परतीचा पाऊस दोन दिवस उशिरा निघाला असला, तरी जिल्ह्यात तो नियोजित वेळेत पोहोचला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठ दिवसांत त्याची माघार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *