Headlines

परतीच्या पावसाने दिलासा; सोयाबीन, भुईमूग, मक्यासह चाऱ्याला संजीवनी:घाटघरपासून सुरू झालेला पावसाचा प्रवास अकोले तालुकाभर‎




गणेशोत्सवाच्या काळात अकोले तालुक्यावर परतीच्या पावसाची कृपादृष्टी झाली आहे. आदिवासीबहुल भागातील प्रमुख धरणे आधीच भरलेली असताना बिगर आदिवासी भागातील शेतकरी मात्र पावसाच्या प्रतीक्षेत होता. सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मका आणि चाऱ्याची उभी पिके सुकत असताना परतीच्या पावसाने घाटघरच्या वाटेने तालुक्यात पुनरागमन केले. रविवारी आणि सोमवारी झालेल्या पावसाने पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्व प्रमुख धरणे व लघुपाटबंधारे प्रकल्प समाधानकारक स्थितीत आहेत. रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांत घाटघर येथे २५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर पावसाने तालुकाभर जोर धरला. भंडारदरा येथे २८, निळवंडे ४०, रतनवाडी ५६, घाटघर ३०, पांजरे १४, वाकी ३० तर अकोले येथे १ मिमी पाऊस झाला. या हंगामात आतापर्यंत घाटघर येथे ४६०२, रतनवाडी ३९२७, पांजरे २८३६, भंडारदरा २५४१, वाकी २०९१, निळवंडे ९९१, अकोले ४५८ आणि आढळा येथे ३१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तालुक्यातील १२ लघुपाटबंधारे प्रकल्प आणि भंडारदरा, आढळा, वाकी ही प्रमुख धरणे १०० टक्के भरली आहेत. निळवंडे धरण ९६.२९ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणातून ८१५ क्युसेक, तर निळवंडेतून १४७० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गेल्या २४ तासांत तालुक्यात रतनवाडी ५६ मिमी, निळवंडे ४० मिमी, घाटघर ३० मिमी, वाकी ३० मिमी, भंडारदरा २८ मिमी, पांजरे १४ मिमी, अकोले १ मिलिमीटर असा पाऊस झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *