Headlines

शेतकऱ्यांसाठी 1 महिन्याचा पगार देणार:आमदार अन् कर्मचाऱ्यांनीही पगार द्यावा, लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत, सरकार कुठून पैसे आणणार- संजय गायकवाड




राज्यात नुकतीच शेतकरी कर्जमाफी झाली आहे, तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक भार आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने तरी पैसे कुठून आणायचे? आपला देश आणि शेतकरी वाचवण्यासाठी आपण सर्वांनीच पुढे आले पाहिजे. यासाठी मी माझा एक महिन्याचा संपूर्ण पगार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहे, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. आमदार गायकवाड म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. तसेच दुष्काळाच्या मदतीबाबत सरकारकडे महत्त्वाची मागणी केली. राज्यातील मुख्य सचिवांपासून ते सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत आणि सर्व आमदारांसह शासकीय व निमशासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपला एक दिवसाचा किंवा एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा. शेतकरी सध्या अत्यंत भीषण संकटात असून, यंदा ते आनंदात दिवाळी साजरी करू शकणार नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनीही यंदा अत्यंत साधेपणाने दिवाळी साजरी केली पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजारांची मदत मिळावी आमदार गायकवाड म्हणाले की, साधारणपणे 5 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर केला जातो. मात्र, त्यापूर्वी तीन टप्प्यांत होणारे सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील महिन्यात राज्यात दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये शक्य नसले, तरी किमान 50 हजार रुपये मदत सरकारने तात्काळ दिली पाहिजे. बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त यादीत असून, पालकमंत्री जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष देऊन असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. राहुल बोंद्रे शिवसेनेत येणार होते, पण… आमदार गायकवाड म्हणाले की, राहुल बोंद्रे हे शिवसेनेत प्रवेश करणार होते. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटही झाली होती. परंतु, दुर्दैवाने मी 15 दिवस कर्नाटक दौऱ्यावर गेलो आणि त्यानंतर 20 दिवस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत व्यस्त राहिलो. याच काळात त्यांनी आपला निर्णय बदलला. तरीही, महायुतीमध्ये जो कोणी येण्यास उत्सुक असेल, त्याचे आम्ही स्वागतच करू. हे ही वृत्त वाचा

राहुल गांधींचा फोन अन् बोंद्रेंचा यु-टर्न:अखेरच्या क्षणी राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द, म्हणाले- सर्व काही गमावले तरी काँग्रेससोबतच राहीन

बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा चेहरा आणि चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राज्य राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. स्वतः बोंद्रे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तबही केले होता. मात्र, या राजकीय नाट्यात थेट दिल्लीतून सूत्रे हलली आणि राहुल गांधी यांनी फोन करून मनधरणी केल्यानंतर बोंद्रे यांनी आपला निर्णय मागे घेतला. भाजपच्या उंबरठ्यावरून बोंद्रे माघारी फिरल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *