Headlines

कृषी विभागाच्या नावाने बनावट भरती जाहिरात फिरली:अमरावती विभागाने क्लार्क पदांसाठी भरती सुरू नसल्याचे सांगितले




महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील भरतीची बनावट जाहिरात समाजमाध्यमांवर आणि इंटरनेटवर फिरत असल्याचे समोर आले आहे. अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने अशी कोणतीही भरती सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. जाहिरात क्रमांक ३४१२ आणि ८ ऑक्टोबर २०२६ अशी माहिती असलेल्या या जाहिरातीत ‘क्लार्क वर्ग-३ (गट-क)’ पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागवले होते. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२६ दिली होती. कार्यालयाने ही जाहिरात बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले. या जाहिरातीचा कार्यालयाशी कोणताही अधिकृत संबंध नाही. उमेदवारांनी या जाहिरातीच्या आधारे अर्ज किंवा कागदपत्रे सादर करू नयेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक डॉ. प्रशांत नाईक यांनी केले. कृषी विभागातील भरतीची अधिकृत माहिती केवळ krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *