Headlines

नागपुरात नवविवाहित शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले:लग्नाला अवघे 2 महिने, घरात दारूची बाटली आणि दोन ग्लास आढळले, घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट




अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या शिक्षक दाम्पत्याने नागपुरात जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने दोघेही गडचिरोली येथून नागपुरातील घरी आले होते. मात्र, सुट्टीसाठी एकत्र आलेल्या या नवदाम्पत्याचा प्रवास दुर्दैवी घटनेने संपला. मनीष आणि सोनाली अशी मृत शिक्षक दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बेलतरोडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि सोनाली यांचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही गडचिरोली येथे एकत्र राहत होते. दोघेही शिक्षक असल्याने तेथेच आपली नोकरी सांभाळत होते. मनीषचे नागपुरातील रेवतीनगर परिसरात घर आहे. दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी हे दाम्पत्य नागपुरात आले होते. दरम्यान, मनीषचे कुटुंबीय देवदर्शनासाठी बुद्धगया येथे गेले असल्याने घरी मनीष आणि सोनाली हे दोघेच होते. शनिवारी वाद झाल्याचा संशय घरात दोघेच असताना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, त्याचे स्वरूप काय होते आणि त्यानंतर काय घडले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घराच्या हॉलमध्ये दारूची एक बाटली आणि दोन ग्लास आढळून आले आहेत. त्यामुळे घटनेपूर्वी घरात नेमके काय घडले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. नातेवाईक घरी आले, मात्र दरवाजा उघडलाच नाही रविवारी मनीषचे काही नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी रेवतीनगर येथील घरी आले होते. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. नातेवाईकांनी अनेकदा दरवाजा ठोठावला. तसेच मनीष आणि सोनाली यांना फोन करून संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ प्रयत्न करूनही दरवाजा उघडला जात नसल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी घराच्या टिनाच्या शेडवरून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश केला. तेथून खिडकीतून घरात पाहिले असता मनीष आणि सोनाली हे दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे दृश्य पाहताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने बेलतरोडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घरात दारूची बाटली आणि दोन ग्लास; पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक तपास प्रक्रिया सुरू केली. घराच्या हॉलमध्ये दारूची बाटली आणि दोन ग्लास आढळल्याने पोलिसांकडून त्या अनुषंगानेही माहिती घेतली जात आहे. शनिवारी दुपारी झाल्याचा संशय असलेला वाद, दाम्पत्याची मानसिक अवस्था आणि घटनेपूर्वीच्या घडामोडी यांचा तपास केला जात आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या या दाम्पत्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ कायम आहे. हा प्रकार नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याचा उलगडा पोलिसांच्या तपासानंतरच होणार आहे. सध्या या घटनेमागील कारणाबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. हेही वाचा…. रामदास कदमांना आग्र्याला पाठवा!:सुनील तटकरेंचा पलटवार; म्हणाले- अजितदादा अपघातावरून कदमांचे आरोप तथ्यहीन, 5 हजार कोटींच्या बदनामीची नोटीस पाठवणार अजित पवार यांच्या अपघातावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणात सुनील तटकरे यांची चौकशी करण्याची मागणी रामदास कदम यांनी केली होती. तसेच माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या मृत्यूबाबतही कदम यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर आता सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत कदम यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एवढेच नव्हे, तर रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *