Headlines

सोलापूर-अक्कलकोट महामार्गालगत खासगी वाहनतळावर भीषण आग:एका ट्रकने घेतला पेट, आगीचा इतर वाहनांनाही विळखा, 6 ट्रक जळून खाक




सोलापूर-अक्कलकोट महामार्गालगत अक्कलकोट शहराच्या हद्दीजवळ असलेल्या खासगी वाहनतळावर उभ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने वाहनतळावर एकच गोंधळ उडाला. आगीची तीव्रता इतकी होती की, शेजारी उभ्या असलेल्या अन्य ट्रकनाही आगीने आपल्या कवेत घेतले. या दुर्घटनेत जवळपास 5 ते 6 ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर-अक्कलकोट महामार्गालगत असलेल्या खासगी वाहनतळावर अनेक मालवाहू ट्रक उभे होते. यापैकी एका ट्रकला अचानक आग लागली. सुरुवातीला आगीचे प्रमाण कमी होते; मात्र काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले. वाहनतळावर एकमेकांच्या जवळ ट्रक उभे असल्याने आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्या. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. एका ट्रकनंतर दुसऱ्या ट्रकने पेट घेतल्याने काही वेळातच वाहनतळावर आगीचे मोठे लोळ दिसू लागले. चालक आणि नागरिकांनी वाहने हलवली आगीचा वेग पाहता वाहनतळावर उभ्या असलेल्या अन्य वाहनांनाही धोका निर्माण झाला होता. आग आणखी पसरल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने हालचाली सुरू केल्या. आगीच्या परिसरातील काही ट्रक आणि इतर वाहने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. यामुळे आगीचा आणखी मोठ्या प्रमाणात फैलाव होण्यापासून रोखण्यात मदत झाली. मात्र, आगीच्या विळख्यात सापडलेल्या 5 ते 6 ट्रकचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठी प्रयत्न घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, ट्रकने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने आणि आगीची तीव्रता अधिक असल्याने अतिरिक्त अग्निशमन यंत्रणेची गरज भासली. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका तसेच एनटीपीसीकडूनही अग्निशामक बंब पाचारण करण्यात आले. अनेक अग्निशामक बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची गर्दीही झाली होती. नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्याकडून पाहणी दरम्यान, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच अग्निशमन दल आणि संबंधित प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती घेत आवश्यक सूचना दिल्या. सुरुवातीला आगीने अत्यंत भीषण स्वरूप धारण केले होते. या दुर्घटनेत जवळपास 6 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, इतर वाहने वेळीच बाजूला हलवण्यात आल्याने संभाव्य धोका टळला. अतिरिक्त अग्निशामक बंबही घटनास्थळी दाखल झाले असून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट या दुर्घटनेत ट्रक जळून खाक झाल्याने वाहनमालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, आगीमुळे कोणालाही दुखापत झाली नसल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. वाहनतळावर उभ्या असलेल्या ट्रकला नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे आग लागली का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली जात असून आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. हेही वाचा…. ‘उद्ध्वस्त करतो, बघून घेतो’ अशा धमक्या चालणार नाहीत:मी सुद्धा पाटील’, सतेज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना इशारा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ डोळे वटारले, तरी त्यांचे राजकीय साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानाला सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सरकारी पदाचा आणि सत्तेचा वापर करून धमक्या देऊ नका. ‘उद्ध्वस्त करतो, बघून घेतो’ अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत. मीसुद्धा पाटील आहे, अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *