![]()
दुष्काळ असूनही यंदा लक्ष्मीपूजनाच्या रात्री जास्त फटाके फोडण्यात आले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अमरावतीतील हवेचे प्रदूषण वाढल्याची नोंद झाली. यंदा एक्यूआय २७९ होता, तर गतवर्षी तो २१३ होता. दोन्ही वर्षांच्या आकड्यांत ६६ अंकांचा फरक आहे. गतवर्षी २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन होते. त्या रात्री अमरावतीचा एक्यूआय २१३ नोंदवला गेला. यंदा ९ नोव्हेंबरला तो २७९ वर पोहोचला. हवेतील धूळ, सूक्ष्म आणि मध्यम धूलिकण तसेच घातक वायूंचे प्रमाण एअर क्वालिटी इंडेक्समधून समजते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) श्री शिवाजी महाविद्यालय आणि विद्यापीठ मार्गावरील शिवनेरी कॉलनी येथे मोजणी केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे सतत सुरू असतात आणि हवेची नोंद घेतात. केंद्रांवर पीएम २.५ (सूक्ष्म धूलिकण) आणि पीएम १० (मध्यम धूलिकण) यांचे प्रमाण मोजले जाते. कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, अमोनिया आणि जमिनीच्या पातळीवरील ओझोन यांसारख्या घटकांचीही नोंद होते. शिवनेरी कॉलनीतील नोंदीनुसार, दोन्ही वर्षी रात्री १० ते ११ या वेळेत प्रदूषण सर्वाधिक होते. दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये पीएम १० चा आकडा २१३ होता. २०२६ मध्ये तो ६६ अंकांनी वाढून २७९ झाला. यंदा जास्त फटाके फोडल्याने हवेत धूर साचला आणि प्रदूषण वाढले, असे या आकडेवारीतून दिसते. दिव्य मराठीचे हवामान अभ्यासक जितेंद्र पुरते यांनी पीएम २.५ आणि पीएम १० बद्दल माहिती दिली. पार्टिक्युलेट मॅटरचे हे कण वायू नसून हवेत तरंगणारे सूक्ष्म धूळ, धातू आणि कार्बनचे कण आहेत. पीएम २.५ चे सूक्ष्म कण श्वासावाटे फुफ्फुसात आणि रक्ताभिसरण संस्थेत जाऊ शकतात. त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. या कणांपासून बचाव करणे आवश्यक आहे.
Source link
दिवाळीत अमरावतीचा एक्यूआय 66 अंकांनी वाढला:गतवर्षी 213 , यंदा 279 ; फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण वाढल्याची नोंद