Headlines

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरील वक्तव्यांवरून उपचारांची मागणी:चंदन साळुंखे यांचे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पत्र




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कसबा मतदारसंघ विभागप्रमुख चंदन साळुंखे यांनी नव‌नाथ उत्तम बन यांच्याबाबत पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना उद्देशून पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी बन यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची मागणी केली आहे. राज्यातील गुन्हेगारी, राजकीय घडामोडी आणि सामाजिक प्रश्नांचा संबंध बन हे उद्धव ठाकरे यांच्याशी जोडत असल्याचा आरोप साळुंखे यांनी पत्रात केला आहे. तसेच ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबत त्यांच्या वक्तव्यांवरही आक्षेप घेतला आहे. बन यांच्या मानसिक आरोग्याबाबत साळुंखे यांनी दावा केला असून, त्यांच्या उपचारांचा खर्च शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख प्रशांत जी राणे, विभाग प्रमुख चंदन साळुंके, शिवसेना महिला आघाडी च्या रेखाताई कोंडे, युवा सेना शहर प्रमुख राम थरकुडे, युवराज पारिख, ज्ञानंद कोंढरे, पंकज बरीदे, राकेश बोराटे, अमर काची, सनी गवते, अरविंद जैन, जुबेर तांबोळी, राहुल शेडगे, शरद गुप्ते, हर्षद ठकार, दत्ता देशमुख, भरत जाधव, दीपक पाटील, रेवन सुळ, अजित बांदल, प्रकाश चौरे, सुशील चिंचवले उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करा! उपमहापौर परशुराम वाडेकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; वडगाव शेरी मतदारसंघात १५ शाखांचे उद्घाटन कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती पत्रांचे वाटप उत्साहात रिपब्लिकन पक्ष हा खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पक्ष असून, श्रमिक, कष्टकरी आणि समाजासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. बाबासाहेबांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून पक्षाशी एकनिष्ठ राहावे आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पुणे शहराच्या वतीने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी १५ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वडगाव शेरी परिसरातील ब्रह्मा सनसिटी रोडवरील समर्थ बँक्वेट हॉल येथे कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वाडेकर बोलत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *