![]()
कंपनीत संचालकपद देण्याचे आणि शेअर ट्रेडिंगमधून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यात ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलाची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोथरूड पोलिसांनी राम रामचंद्र भाटले आणि रोशनी झुनझुनवाला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत भागवताराव नवले (वय ६३) यांनी याबाबत फिर्याद दिली. ही घटना २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२६ या काळात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भाटले यांनी नवले यांच्या मुलाचा विश्वास संपादन केला आणि त्याला कंपनीत संचालकपद देण्याचे आश्वासन दिले. शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असेही सांगितले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून नवले आणि त्यांच्या मुलाने आरोपींकडे २५ लाख रुपये दिले. मात्र, त्यांना परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यानंतर नवले यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून २२ लाखांची फसवणूक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाकडून २२ लाख रुपये ऑनलाइन घेतल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैसे मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रराम बालण्णा कुतापेल्ली (वय ७१, रा. फ्लॅट ए/१, दर्शन पार्क को-ऑप. सोसायटी, मोहनवाडी, आळंदी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ५ ते १५ ऑक्टोबरदरम्यान आरोपीने ऑनलाइन संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. सिमकार्डाचा गैरवापर झाल्याचे सांगून आरोपीने सिक्युरिटी डिपॉझिट आणि डिजिटल पडताळणीच्या नावाखाली पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले. त्यानुसार कुतापेल्ली यांच्याकडून २२ लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Source link
संचालकपद आणि शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून 25 लाखांची फसवणूक:पुण्यात ज्येष्ठ नागरिक आणि मुलाची फसवणूक; राम रामचंद्र भाटले आणि रोशनी झुनझुनवाला यांच्यावर गुन्हा