Headlines

पुण्यात 26 वीरपत्नींसोबत भाऊबीज साजरी:सैनिक मित्र परिवारासह संस्थांचा पुढाकार; 1962 ते 1999 च्या युद्धांतील शहीद आणि बेपत्ता जवानांच्या पत्नी सहभागी




पुण्यात १९६२ ते १९९९ च्या युद्धांतील शहीद आणि बेपत्ता जवानांच्या २६ वीरपत्नींसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांनी सदाशिव पेठेतील नारद मंदिरात हा कार्यक्रम आयोजित केला होता. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषात वीरपत्नींना मानवंदना देण्यात आली. भारतीय सैनिक, वीरमाता आणि वीरपत्नींच्या देशासाठीच्या योगदानाची उपस्थितांनी आठवण केली. सैनिक मित्र परिवार, सेवा मित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन, नारद मंदिर, बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघटना आणि सहयोगी संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार विजय कुवळेकर, चंदूकाका सराफ पेढीचे संचालक अतुल शहा, रोटरी क्लबच्या डॉ. शुभदा जठार, नारद मंदिराचे अध्यक्ष डॉ. विलासबुवा परांजपे, हरी गणेश साने प्रतिष्ठानचे संजय गोखले आणि सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ महाडिक उपस्थित होते. प्रत्येक वीरपत्नीला भाऊबीज म्हणून साडी, मिठाई, तिरंगी उपरणे, चांदीचे नाणे आणि भेटवस्तू देण्यात आल्या. चंदूकाका सराफ पेढी आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीने उपक्रमाला सहकार्य केले. रेखा देशपांडे, नितीन पंडित, गिरीश पोटफोडे, पराग गुजराथी, अमर लांडे आणि शेखर कोरडे यांनी आयोजनात सहभाग घेतला. विजय कुवळेकर म्हणाले, सैनिकांमुळे आपण आनंद साजरा करू शकतो. त्यामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची आठवण ठेवणे हे आपले राष्ट्रकर्तव्य आहे. सैनिकांविषयीची जाणीव संपूर्ण समाजात असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. आनंद सराफ यांनी सांगितले की, हा उपक्रम २००१ पासून सुरू झाला. बेपत्ता आणि शहीद सैनिकांच्या वीरपत्नी व मातांसाठी वानवडी येथे वीरस्मृती वसाहत आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागामुळे तिरंगा आकाशात फडकत आहे. त्यामुळे दरवर्षी त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *