Headlines

पुण्यात शिवछत्रपती चरित्रकथा सोहळा 13 नोव्हेंबरपासून:माहेश्वरी परिवार फाउंडेशन आणि माहेश्वरी समाजाचे आयोजन; स्वामी गोविंदगिरीजी महाराज कथाकथन करणार




हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर आधारित भव्य ‘राजर्षी शिवछत्रपती स्फूर्ती गाथा’ सोहळ्याचे आयोजन माहेश्वरी परिवार फाउंडेशन आणि समस्त माहेश्वरी समाज, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्या ओजस्वी आणि अमृतवाणीतून ही चरित्रकथा सादर होणार आहे. हा तीन दिवसीय ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळा दिनांक १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत महालक्ष्मी लॉन्स, डी.पी. रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम आणि राष्ट्रनिर्माणाचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या भव्य कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुणेकर पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत. तर, सायं. ४ ते ७:३० यावेळेत शिवछत्रपती चरित्र कथा (प्रथम पुष्प) सादर होणार आहे. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ७:३० शिवछत्रपती चरित्र कथा (द्वितीय पुष्प) आयोजित करण्यात आले आहे. तर, रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२:३० यावेळेत शिवछत्रपती चरित्र कथा (समारोप पुष्प) आणि भव्य शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. पुण्यातील सर्व शिवप्रेमी, नागरिक आणि भाविकांनी या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहेश्वरी परिवार फाउंडेशन आणि समस्त माहेश्वरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *