Headlines

14 नोव्हेंबरला शिवटेकडीवर मधुमेह तपासणी शिबिर:निसर्ग भ्रमणासोबत मोफत तपासणी, रक्तदाब-रक्तशर्करा चाचणी आणि मार्गदर्शन




अमरावतीत १४ नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिनानिमित्त शिवटेकडीवर निसर्ग भ्रमण आणि मोफत तपासणी शिबिर होणार आहे. सकाळी ८.३० वाजता सुरू होणाऱ्या शिबिरात बाल मधुमेह, रक्तदाब आणि रक्तशर्करेची तपासणी केली जाईल. प्रश्नोत्तरी आणि मार्गदर्शनाचाही कार्यक्रम आहे. डायबेटिक असोसिएशन अमरावती आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार आहे. यंदा पारंपरिक रॅलीऐवजी निसर्ग भ्रमणाचे आयोजन केले आहे. शिवटेकडीवर येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जाईल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय डफळे म्हणाले की, मधुमेहाची लक्षणे अनेकदा लगेच दिसत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणी करून त्यानुसार काळजी घेणे गरजेचे आहे. गोड पदार्थ टाळणे किंवा कडू चवीचे पदार्थ खाणे म्हणजे मधुमेह टाळणे नव्हे, असे डॉ. डफळे यांनी सांगितले. मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही; मात्र तो नियंत्रणात ठेवता येतो. त्यामुळे इतर आजारांचा धोका कमी करण्यासाठी नियमित काळजी घेणे आवश्यक आहे. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे सचिव डॉ. मिलिंद जगताप, जनसंपर्क प्रमुख राजेश पिदडी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, पीडीएमसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन टेकाडे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनेश वाघाडे उपस्थित होते. तसेच डॉ. रोहित चोरडिया, डॉ. प्रवीण राठी, ओसवाल नवयुवक मंडळाचे ॲड. निखिल जैन आणि समन्वयक विनोद साबळे उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातून मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिन आणि गोळ्या मोफत दिल्या जातात. सध्या १०० रुग्ण इर्विन रुग्णालयाशी जोडलेले आहेत. पूर्वी मोफत औषधांचा लाभ वयाच्या १८ वर्षांपर्यंत मिळत होता. आता डीपीसीच्या निधीतून २५ वर्षांपर्यंत औषधे दिली जातात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *