![]()
विशेष सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) तयार केलेल्या मतदार यादीवर जिल्ह्यातील ३० हजार ३३९ नागरिकांनी तक्रारी आणि सूचना दाखल केल्या आहेत. नाव, पत्ता, लिंग आणि वयातील दुरुस्त्या तसेच मृत व्यक्तींची नावे कमी करण्याबाबत या तक्रारी आहेत. सुनावणी २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबरला जाहीर होईल. प्रशासनाने एसआयआरद्वारे जिल्ह्याची नवी मतदार यादी तयार केली. ती ३१ ऑगस्टला नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध ठिकाणी ही यादी उपलब्ध आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही यादी देण्यात आली आहे. यादीतील नावे तपासून दुरुस्ती सुचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय अधिकारी (एसडीओ) स्तरावर सुनावणी घेतली जात असून, यादीतील चुका दुरुस्त केल्या जात आहेत. नागरिकांना दुरुस्तीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करता येतात. मृत व्यक्तींची नावे कमी करण्यासाठी ‘फॉर्म ७’, तर नाव, पत्ता, लिंग आणि वयातील दुरुस्तीसाठी ‘फॉर्म ८’ भरला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ७ हजार ४५४ नागरिकांनी फॉर्म ७ भरला आहे, तर २० हजार ७०० नागरिकांनी फॉर्म ८ दाखल केला आहे. एकूण तक्रारींपैकी २ हजार १८५ ऑनलाइन, तर २८ हजार १५४ ऑफलाइन अर्जांद्वारे आल्या आहेत. १७ ऑगस्टला जाहीर होणार होती यादी निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार, एसआयआरनंतरची प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टला जाहीर होणार होती. काही तालुक्यांचे काम अपूर्ण राहिल्याने यादी प्रसिद्ध करण्यास १५ दिवस उशीर झाला. त्यामुळे ती ३१ ऑगस्टला जाहीर करण्यात आली. याआधी २४ ऑगस्ट ही तारीखही जाहीर झाली होती.
Source link
मतदार यादीवर 30,339 तक्रारी दाखल:25 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी; अंतिम यादी 30 नोव्हेंबरला जाहीर होणार