Headlines

दहिसरमध्ये गुंदेचा शाळेजवळ भीषण आग:कांदरपाडा परिसरात धुराचे लोट, अग्निशमन दल घटनास्थळी




दहिसर येथील कांदरपाडा परिसरात आज भीषण आग लागल्याची घटना घडली. प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या आरबीआय कॉलनीलगतच्या रस्त्यावर, प्रसिद्ध गुंदेचा शाळेच्या अगदी जवळ ही आग लागली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कांदरपाडा परिसरातील आरबीआय कॉलनी मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक आग भडकली. गुंदेचा शाळेच्या अगदी लगत ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. आगीची तीव्रता लक्षात घेता परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत किती नुकसान झाले, तसेच कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या कारवाईनंतरच आगीचे कारण आणि नुकसानीचा तपशील स्पष्ट होणार आहे. हेही वाचा…. धाराशिवमध्ये अग्नितांडव:घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू, केवळ एकजण बचावला लक्ष्मीपूजनाच्या रात्री संपूर्ण राज्य दिवाळीचा आनंद साजरा करत असताना, धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री एका घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांचा गुदमरून आणि होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *