Headlines

महसूल प्रशासन सार्वजनिक दसरा महोत्सव उत्साहात साजरा करणार:उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची माहिती, नागरीकांतून उत्साहाचे वातावरण




देशातील दुसऱ्या क्रमांकाचा असलेला हिंगोलीचा ऐतिहासीक दसरा महोत्सव यावर्षीही उत्साहात साजरा केला जाणार असून सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोड होऊ नये आणि उत्सवाचा आनंद कायम राहावा, यासाठी महसूल प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असल्याची माहिती हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी मंगळवारी ता. 22 दिली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकांचा दसरा महोत्सव म्हणून हिंगोलीच्या दसरा महोत्सवाकडे पाहिले जाते. दरवर्षी महसूल प्रशासनाकडे दसरा महोत्सव साजरा केला जातो. मात्र यावर्षी एसआयआर तसेच मतदारांच्या सुनावणी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक यामुळे दसरा महोत्सव महसूल प्रशासनाकडून साजरा करता येणार नसल्याचे पत्र महसूल विभागाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना दिले होते. तर नगर पालिकेने देखील कामाचा ताण असल्याचे सांगत महोत्सव साजरा करण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे दसरा महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, आज उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी घुटुकडे यांनी दसरा महोत्सव उत्साहात साजरा करणार असल्याचे जाहिर केले. प्रशासनाकडे कामाचा मोठा ताण आणि विविध कामांचा लोड असला तरी, वर्षभर वाट पाहत असलेल्या सर्वसामान्य जनतेचा हिरमोड होऊ नये म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवाचे बासा पुजन शुक्रवारी ता. 25 आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर ता. 10 ऑक्टोबर ते ता. 25 ऑक्टोबरपर्यंत दसरा महोत्सव साजरा केला जाईल. वेळेच्या कमतरतेमुळे यंदा स्वतंत्र ई-टेंडर न देता, महत्त्वाचे असणारे झुल्याचे आणि गाळ्यांचे टेंडर एकाच व्यक्तीला ठोक पद्धतीने दिले जाणार आहे. या सर्व प्रक्रियेची थेट खुली बोली पद्धतीने सोमवारी ता. 28 दुपारी 12 वाजता लिलाव काढला जाणार आहेत. या लिलावाच्या अनुषंगाने नियमांनुसार सूचना प्रसिद्ध केली जाईल तसेच दसरा समिती कक्षातून त्याचे नियम व अटी प्राप्त करता येतील. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शक कारभार राहावा यासाठी व्हिडिओ चित्रीकरण देखील केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून दसरा महोत्सवाचे आयोजन होणार असल्याने नागरीकांतून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी ड्रोन शोची पर्वणी दसरा महोत्सवात कृषी व औद्योगिक प्रदर्शनीमध्ये विविध मनोरंगनाची साधने, संसारोपयोगी साहित्य विक्रीची दुकाने, खवय्यांसाठी खाद्य पदार्थाची दुकाने असणार आहेत. या शिवाय यावर्षी ड्रोन शो ची पर्वणी देखील असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *