Headlines

प्रेरणा, शिस्त अन् सातत्य हाच यशाचा मार्ग:चिंचणीतील लोकसंवाद उपक्रमात सहायक पोलिस अधीक्षक डगळे यांचे प्रतिपादन‎



विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यश संपादन करण्यासाठी प्रेरणा, शिस्त आणि सातत्य या तीन सूत्रांचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. हे तीन अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत. प्रेरणा तुम्हाला कामाची सुरुवात करण्यास मदत करते, शिस्त तुम्हाला योग्य मार्गावर ठेवते आ

.

गणेशोत्सवानिमित्त आयोजित लोकसंवाद उपक्रमांतर्गत चिंचणी (ता. पंढरपूर) येथील वरदायिनी गणेशोत्सव मंडळ येथे शासनाकडून विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधाबाबत डगळे यांनी संवाद साधला

या वेळी सहायक पोलिस अधीक्षक डगळे म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून, या तीन स्तंभांच्या बळावरच विद्यार्थी आपले ध्येय साध्य करू शकतात. प्रेरणा ही विद्यार्थ्याला एखाद्या कामाची किंवा अभ्यासाची सुरुवात करण्यास मदत करते. ती अंतःकरणातून येणे गरजेचे आहे. मात्र, केवळ प्रेरणेवर विसंबून चालत नाही; त्यासाठी शिस्तीची जोड असावी लागते. शिस्त विद्यार्थ्याला योग्य मार्गावर ठेवते, वेळेचे नियोजन शिकवते आणि अभ्यासातील लक्ष विचलित होऊ देत नाही. प्रेरणेने सुरू केलेले काम शिस्तीने पुढे नेले तरीही अंतिम यशासाठी सातत्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. सातत्यच विद्यार्थ्याला त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवते. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांमागे न धावता या तीन मूल्यांना आपल्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा बनवावे, जेणेकरून ते एक आदर्श आणि यशस्वी नागरिक बनू शकतील, असा संदेश या प्रसंगी देण्यात आला. या वेळी कार्यक्रमास मोहन अनपट, शशिकांत सावंत, चंद्रकांत पवार, शरद सावंत तसेच चिंचणी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्‍थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *