Headlines

Navnath Ban Targets MVA & Sharad Pawar Over Maharashtra Drought Statement


मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे स्टेडियमवर होणारी कोणतीही क्रिकेट मॅच नाही. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना घरात बसून ऑनलाईन बैठका चालवत होते आणि फेसबुकवरून संवाद साधत होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी इतरांना सल्ले देण्याचे काम करू नये. देवेंद्र फड

.

नवनाथ बन म्हणाले की, शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना जलसिंचनाची कामे योग्य पद्धतीने केली असती, तर आज महाराष्ट्रावर दुष्काळाची ही बिकट वेळ आलीच नसती. सुप्रिया सुळे 1 एकर शेतीमधून करोडो रुपये कसे कमावतात, याचे सूत्र त्यांनी महाराष्ट्रातील सामान्य शेतकऱ्यांना बांधावर जाऊन सांगितले पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.

मविआने 40 हजार कोटी रुपये द्यावे

नवनाथ बन म्हणाले की, राऊतांची कुंभमेळ्याचा खर्च दुष्काळग्रस्तांना देण्याची मागणी रास्त आहे, पण माझी त्यांना एकच विनंती आहे. अडीच वर्षांच्या मविआ सरकारच्या काळात रोज 100 कोटी या हिशोबाने तब्बल 90 हजार कोटींची वसुली झाली. त्यातील 40 हजार कोटी रुपये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावेत. मातोश्री-2 चा खर्च आणि कोविड काळातील वसुलीतून हा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख यांनी करावी. त्या तिजोरीच्या चाव्या तर संजय राऊतांकडेच आहेत.

राऊतांनी हज यात्रेवर होणाऱ्या खर्चाला विरोध करून दाखवावा

नवनाथ बन म्हणाले की, मविआला कुंभमेळा आणि सेवा सप्ताहावर आक्षेप असतो, मात्र हज यात्रा, उरूस आणि जुलूसला ते कधीही विरोध करत नाहीत. औरंगजेबाच्या कबरीवरील खर्चावर हे गप्प बसतात. राऊतांच्या पक्षाचा इतिहास केवळ ‘मेवा’ खाण्याचा आहे, तर भाजपचा इतिहास जनतेची ‘सेवा’ करण्याचा आहे. ताकद असेल तर राऊतांनी हज यात्रेवर होणाऱ्या खर्चाला विरोध करून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

हे ही वृत्त वाचा

मोदींच्या वाढदिवसाचा उधळपट्टीचा खर्च थांबवा अन् दुष्काळावर वापरा:चोरांना पाठीशी घालणाऱ्या फडणवीसांनी माफी मागावी- राऊत

शरद पवारांना 87 वर्षांचे नेते म्हणणे चुकीचे आहे ते महाराष्ट्र आणि देशातील शेतकऱ्यांचे प्रमुख नेते आहेत. शेती अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जेवढी जाण त्यांना आहे तितका मोठा दुसरा नेता आज राजकारणात नाही. आम्ही सुद्धा मविआचे सर्व नेते आंदोलन करत आहोत, पण प्रत्येकांनी एकत्र येत आंदोनल केले तर त्यांचा फायदा होऊ शकतो, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.