Headlines

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2026:राज्यात 5 जागांसाठी बिगुल वाजले; शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात होणार इलेक्शन, 'या' दिवशी पडणार मतपेटीत कौल!




महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे मोठी रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील 5 महत्त्वाच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या या रिंगणात अमरावती, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगर या प्रमुख विभागांचा समावेश आहे. एकीकडे दुष्काळ, पाणी टंचाईचे सावट असताना दुसरीकडे निवडणुका लागल्यात. त्यामुळे आरोप प्रत्यारोपालाही धार येईल. निवडणुकीचे मुख्य वेळापत्रक विधान परिषदेच्या या निवडणुकीत 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर 27 ऑक्टोबर रोजी निकाल लागून पदवीधर आणि शिक्षकांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो हे स्पष्ट होईल. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुकांनी गणिते मांडायला सुरुवात केली आहे. मतदानाचा दिवस: 23 October मतमोजणी व निकाल: 27 October (ही बातमी अपडेट होत आहे)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *