Headlines

पायरपाडा ते भिकारसोंडा रस्त्याची चाळण:ग्रामस्थांचा मोर्चाचा इशारा, मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना ग्रामस्थांची कसरत‎




साल्हेर परिसरातील पायरपाडा ते भिकारसोंडा या ५ किमी रस्त्याची अवस्था पाहिल्यावर ‘विकास’ नेमका कुणाचा झाला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे आदिवासी बांधवांचे हाल होत असून, आता त्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे. “निधी येतो, पण मुरतो कुठे?’ असा थेट सवाल करत ग्रामस्थांनी साल्हेर ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. पायरपाडा व भिकारसोंडा या वस्त्यांना जोडणारा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने दुचाकीस्वारांचे अपघात नित्यनेमाचे झाले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याचे रूपांतर चिखलाच्या मैदानात होते. सर्वात भयावह परिस्थिती रुग्ण आणि गरोदर मातांची होते, अँब्युलन्स नसल्याने गर्भवती महिलेला खासगी वाहनाने हलवावे लागले रविवारी रात्री सुमारे १०:०० वाजता एक गंभीर प्रसंग घडला. भिकार सोंडा येथील एका गर्भवती महिलेला अचानक तीव्र वेदना सुरू झाल्याने तिला तातडीने दवाखान्यात नेण्याची गरज निर्माण झाली. मात्र, साल्हेर ते भिकार सोंडा दरम्यानचा रस्ता खराब असल्यामुळे वाहतुकीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. संबंधित रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णाला घेऊन कळवणकडे गेली असल्याने ती वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे महिलेला होणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या कठीण परिस्थितीत ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ खासगी वाहनाची व्यवस्था केली आणि खराब रस्त्याचा सामना करत त्या गर्भवती महिलेला दळखाने येथील दवाखान्यात सुरक्षितपणे दाखल केले. या घटनेमुळे खराब रस्ते आणि अपुरी वैद्यकीय सुविधा यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून कसरत करावी लागते. गरोदर माता यांना साल्हेर येथे उपचारासाठी नेत असतांना रस्त्यामुळे जीवघेण्या कळा सोसाव्या लागतात. नेत्यांना आता गावबंदीची करण्याची वेळ ^प्रशासन आदिवासींच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. राज्य शासनाकडून निधी विकासकामांसाठी येतो की केवळ कंत्राटदारांना पोसण्यासाठी? हे सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही. निवडणुकीपुरता चेहरा दाखवणाऱ्या नेत्यांना आता गावबंदी करण्याची वेळ आली आहे. – सुकलाल शिंदे, ग्रामस्थ, पायरपाडा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *