Headlines

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा सन्मान होणे महत्वाची बाब- शिंदे:अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदवावा‎




ग्रामीण भागातील गावपातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सन्मान ही महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. विजयराज शिंदे यांनी केले. ते कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. यावेळी विविध सेवा उपक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार बुलढाणा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष अंकूर देशपांडे यांनी साखरखेर्डा येथे कोरोना काळात जीवाची पर्वा न करता घरोघरी निस्पृहपणे कार्य करणाऱ्या व नेहमीच गावपातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात भाजपचे प्रदेश प्रतिनिधी रावसाहेब देशपांडे, उपसरपंच अंकिता संग्रामसिंह राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष अंकूर देशपांडे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव परवेझ भाई, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविता पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, निता देशपांडे, पूजा रिंढे, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, उपाध्यक्ष मनोज पऱ्हाड, दिपक चिंचोले, शिवाजी वाघ, गोपाल पाझडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित होते. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचीही उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावपातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांचा शाल, हळदीकुंकू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्पमित्र वनिता बोराडे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डिगांबर गाडे यांनी केले. आभार संतोष दसरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा उपाध्यक्ष मनोज पऱ्हाड, दिपक रिंढे, भाजप युवा आघाडीचे संग्रामसिंह राजपूत, शिराळे, बंगाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान विविध सेवा शिबिरे, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, रक्तदान, स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, जनजागृती आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या सेवा संकल्प अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. विविध उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून कवी डिगांबर गाडे यांच्या “ओंजळ भरली मोत्याने’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन विजयराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *