Headlines

‘ट्रिगर-1’ नुसार आज दुष्काळ जाहीरहोणार, दिवाळीपूर्वीच मदत- मुख्यमंत्री:अमरावती व वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा




राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शुक्रवारी ( २५ सप्टेंबर) ‘ट्रिगर-१’ नुसार दुष्काळ जाहीर करणार आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना थेट मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीनंतर अमरावती विमानतळावर ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी वाशिमच्या म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याचे बँकांना निर्देश मदतीच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दर आठवड्याला आढावा घेईल. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी खासगी कारणावरून अडवणूक करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. पावसाची २५ टक्के तूट असल्यास ट्रिगर-१ लागू सलग ३ ते ४ आठवडे पावसाचा खंड पडल्यास आणि २५ टक्के तूट असल्यास ‘ट्रिगर-१’ लागू होतो. काही जिल्ह्यांत ऑगस्टमध्ये ५३.७ टक्के तर सप्टेंबरमध्ये अवघा ३०.७ टक्के पाऊस पडल्याने १३ तालुक्यांमध्ये २० दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. अमरावती विभागातील ५६ तालुके दुष्काळाच्या छायेत अमरावती विभागातील ५६ तालुक्यांचा समावेश असून, ट्रिगर १ चा विचार केल्यास विभागातील सर्वच तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. या भागात दुष्काळाची तीव्र झळ पोहोचली असून, सोयाबीनसह कापूस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *