Headlines

अटी-शर्ती न लावता सरसकट मदत करावी- आ. रोहित पवार:रजापूर, आडगाव येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी‎




पैठण तालुक्यातील रजापूर व आडगाव जावळे येथे राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने कोणत्याही अटी-शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. मराठवाड्यात शेतीचे सुमारे ३५ हजार कोटी, विदर्भात २५ हजार कोटी, तर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात १७ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा पवार यांनी केला. मागील अतिवृष्टीची मदत अद्याप मिळालेली नसून संभाजीनगर जिल्ह्यात अवघी २५० रुपये, जालन्यात ६० रुपये आणि बीडमध्ये २६ रुपये हेक्टरी मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने १० दिवसांत ३५ हजार कोटींची कर्जमाफी करावी, शेतमजुरांना प्रति कुटुंब २५ हजार रुपयांचे अनुदान द्यावे आणि जनावरांच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील कडक सुरक्षेवर टीका करत त्यांनी मराठवाड्याच्या सिंचन प्रश्नावरून सरकारला लक्ष्य केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट मदतीचे आश्वासन दिले आहे. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, चंद्रकांत दानवे, डॉ. भीमराव हत्तीअंबीरे, पांडुरंग तांगडे, पंकज बोराडे, सलीम शेख, राजेश पवार, कुलदीप शिंदे, माजी आमदार संजय वाघचौरे, रविकांत वर्पे, सुशील बोरडे, अतुल गावंडे, अखलाख देशमुख, संजय शेटे, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी रोहित पवार यांनी मराठवाड्याच्या सिंचनाच्या प्रश्नावरही सरकारला लक्ष्य केले. मराठवाड्यात पाणी आणण्याच्या आश्वासनांचा पुनरुच्चार अनेकदा झाला, मात्र प्रत्यक्षात पाणीप्रश्न कायम असल्याचा आरोप त्यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *