Headlines

लासलगावात शिवसूर्य प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात समाजोपयोगी उपक्रम:बिबट्या-सर्प जनजागृतीसह नेत्रतपासणी शिबिर; नागरिकांचा प्रतिसाद‎



येथील शिवसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या या सर्व उपक्रमांना परिसरातील नागरिकांचा, विशेषतः महिलांचा अत्यंत

.

उत्सवाची सुरुवात २० सप्टेंबर रोजी मान-वंदना व वरदहस्त ढोल पथकाच्या दिमाखदार कार्यक्रमाने झाली. या प्रसंगी परिसरातील स्थानिक रहिवाशांसाठी आणि भाविकांसाठी मोठ्या पडद्यावर ‘हनुमान वंश’ हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी ‘फिजिओथेरपी का व केव्हा करणे गरजेचे आहे?’ या विषयावर तज्ज्ञ डॉ. सुश्मिता अविनाश पाटील (एम.डी. फिजिओथेरपी) यांचे सविस्तर व्याख्यान व आरोग्य मार्गदर्शन झाले.

२२ सप्टेंबर रोजी ‘मानव-बिबट्या सहजीवन व सर्प जनजागृती मोहीम’ यशस्वीरीत्या राबवून वन्यजीव व सापांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी संकल्प मंगल कार्यालय येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले.२४ सप्टेंबर रोजी मातोश्री आयुर्वेदिक महाविद्यालय, बाभुळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात येत असून, या शिबिरामध्ये गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन व योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *