![]()
सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य व रक्तदान शिबिराच्या आयोजनाप्रित्यर्थ येथील अभिमन्यू गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, उपजिल्हा रुग्णालय तथा रक्तदाता संघाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी शहरातील विविध रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. समाजासाठी जगण्याची आणि दुसऱ्याचा जीव वाचविण्याची भावना जोपासणारा प्रेरणादायी उपक्रम म्हणून अभिमन्यू गणेश मंडळ व जय भवानी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून दुसऱ्याला नवजीवन मिळवून देण्याचे उत्तरदायित्व त्यांनी पार पाडले. शिबिरात अनेकांनी प्रथमच रक्तदान केले. सामाजिक जबाबदारीची जाणीवही त्यांनी कृतीतून दाखवून दिली. जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपघात झाल्यास रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासते. जिल्ह्यात रक्तदान शिबिरे कमी होत आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर हे शिबिर अधिक महत्त्वाचे ठरले. दरम्यान सामाजिक बांधिलकी, मानवता आणि सुरक्षिततेचा संदेश देणारा हा उपक्रम भविष्यातही अनेकांना प्रेरणा देईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. मोर्शी रक्तदाता संघाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, कार्याध्यक्ष तथा जयदेवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मिलिंद ढोले, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद पोतदार, सचिव गजानन हिरुळकर, सहसचिव अजय पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, शहरातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रक्त संकलनासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. प्रेरणा वानखडे, प्रतीक्षा पांचाळे, सुजाता पांडे, स्वातीताई बुरंगे, श्रीकांत गोहाड, सुवर्णा श्रीराव, निकिता शहाणे, कांचन राऊत, अमोल झाडे, योगेश महाजन, सुजित वानखेडे, युसुफ शेख उपस्थित होते.
Source link
मोर्शीच्या अभिमन्यू गणेश मंडळाने केले गणेशाच्या चरणी रक्ताचे दान:अनेकांचा पहिलाच प्रयत्न : तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित