Headlines

महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी लहुजी शक्ती सेनेची बैठक:अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण तातडीने लागू करा‎




अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण महाराष्ट्र शासनाने तातडीने लागू करावे. या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी लहुजी शक्ती सेना, अकोला जिल्ह्याच्या वतीने विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नामदेवराव ससाने, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. प्रदेश महासचिव वामनराव भिसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. महामोर्चा यशस्वी करण्यासाठी तसेच अकोला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मातंग समाजबांधवांनी मुंबईतील मोर्चात सहभागी व्हावे. यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मोर्चाच्या नियोजनाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यासंदर्भातही चर्चा झाली. यावेळी पश्चिम विदर्भ महासचिव प्रकाश दांडगे, पश्चिम विदर्भ सचिव श्रीकृष्ण चव्हाण, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शंकरराव अवचार, जिल्हाध्यक्ष पिंटू अंजनकर, महानगराध्यक्ष भाऊराव साबळे, पंचायत समिती सदस्य भास्करराव अंभोरे, जिल्हा संघटक जानराव गवई, नानाभाऊ सदाशिव, अमोल तायडे, दिलीप पाटेकर, छाया वारके, बाळू गायकवाड, योगेश सोनवणे, गोपाल नूपनारायण, गजानन गवई यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बैठकीत महामोर्चासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी करून घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *